6 February Headlines : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबरोबरच राज्यासह देशभर एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर कॉंग्रेस आंदोलन करणार आहे. याबरोबरच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरू होणार आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरणार

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होणार आहे. या पोट निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज भाजपकडून चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबरोबरच कॉग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचं अधिकृत नाव जाहीर करण्यात आलं नसलं तरी कॉंग्रेसचा उमेदवार आज अर्ज भरणार आहे. राष्ट्रवादीने अद्याप चिंचवडसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र राष्ट्रवादीकडून राहुल कलाटेचं नाव आघाडीवर आहे.

राज्यासह देशभर एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर कॉंग्रेसचं आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादानेच एलआयसी आणि एसबीआयमधील जनतेचा पैसा बुडण्याची भीती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्ती केली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आज राज्यातील एसबीआय आणि एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. अदानी समूहातील कारभाराची केंद्र सरकारने तातडीने चौकशी अशी मागणी करणार आहेत.

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरू होणार आहे. नाशिक, जालना, संभाजीनगर असा शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा असणार आहे. आज नाशिकपासून सुरूवात होणार आहे.

भाजप करणार शिंदे गटा विरोधात आंदोलन

शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगर परिषेदेच्या कारभारा विरोधात भाजपतर्फे डफडे वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे. सिल्लोड नगर परिषदेने भरमसाठ, जुलमी करवाढी विरोधात हे आंदोलन असणार आहे. सिल्लोड नगरपरिषदेच्या कार्यालया समोर करवाढ नोटीशीची होळी करून डफडे वाजवा आंदोलन करणार.

तुमकुरू येथे एचएएल हेलीकॉप्टर फॅक्ट्रीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने आज मोठं पाऊल पडणार आहे. कर्नाटकातील तुमकुरू येथे एचएएल हेलीकॉप्टर फॅक्ट्रीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे.

सुप्रिम कोर्टाचे पाच नवे न्यायमुर्ती पदाची शपथ घेणार

सुप्रिम कोर्टाचे पाच नवे न्यायमुर्ती आज पदाची शपथ घेणार आहेत. न्यायमुर्ती पंकज मिथल, न्यायमुर्ती संजय करोल, न्यायमुर्ती पी वी संजय कुमार, न्यायमुर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमुर्ती मनोज मिश्रा शपथ घेणार आहेत.

रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सोलापुरात असणार आहेत. सकाळी 8 वाजता इंदिरा गांधी पार्क स्टेडियमची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता संगमेश्वर महाविद्यालय आणि दुपारी 4 वाजता वालचंद महाविद्यालय येथे युवकांशी संवाद साधणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पूर्व विदर्भातील टप्पा आजपासून

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पूर्व विदर्भातील टप्पा आजपासून सुरूवात होणार आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात सकाळी 10 वाजता दीक्षाभूमीला वंदन करून यात्रेचा पूर्व विदर्भातील टप्पा सुरू होईल. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही पथनाट्य तयार करण्यात आले असून ते ठिकठिकाणी सादर केले जाणार आहेत. तसेच काही कॉर्नर सभा ही घेतल्या जात आहे.

from maharashtra https://ift.tt/XfDKnmV
6 February Headlines : कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरणार, देशभरात काँग्रेसचं आंदोलन; आज दिवसभरात
February 05, 2023
0
Tags