22 February Headlines : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुप्रिम कोर्टातल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. याबरोबरच शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायच्या निर्णया विरोधात दाखल केलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज दुपारी 3.30 वाजता सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा दुसरा दिवस

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुप्रिम कोर्टातल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. यावेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपने आमदारांवर कारवाई झाली असती तर आताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते असा युक्तीवाद केला. यावर घटनापीठाने तुमचे म्हणणे आम्हाला पटले आहे. परंतू आता वेळ मागे कशी नेणार असा सवाल केला. यावर तुमच्याच जूनमधील आदेशामुळे हे घडले आहे. तेव्हाच्या अध्यक्षांना अपात्रतेच्या प्रस्तावावर निर्णय घेऊ दिला नाही असे सांगितले. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायच्या निर्णया विरोधात दाखल केलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज दुपारी 3.30 वाजता सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. आयोगाविरोधात याचिका कोर्टाने ऐकू नये, त्यांना हायकोर्टानेही दोन वेळा नाकारले असा शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार कीन नाही हे आज स्पष्ट होईल.

चिंचवडमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळी 10:30 वाजत पत्रकार परिषद होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी दापोली - खेड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार

आज मातोश्रीवर दापोली - खेड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. दुपारी 12.30 वाजता मुंबई आणि गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते मातोश्रीवर गोळा होणार आहेत. माजी आमदार संजय कदम, सुर्यकांत दळवी, भास्कर जाधव, अनंत गीते सहभागी होणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृह होणार आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्हं मिळाल्यानंतर पहिली मंत्रीमंडळ बैठक आहे.

कसबा चिंचवड प्रचाराचा धडाका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी 5 वाजता रोड शो करणार. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. याबरोबरच छगन बुजबळ आणि धनंजय मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे.

शरद पवार यांच्या कसब्यात तीन सभा

कसब्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रचार दौरा आहे. ते दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तीन सभा घेणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर आंदोलन करणार

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सत्ताधारी सोडा विरोधकांचेही लक्ष नाही असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर आंदोलन करणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगर येथे महसुल परिषदेचा शुभारंभ

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगर येथे महसुल परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलनाचा तिसरा दिवस

एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन काल विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून मार्ग काढू असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले आहे. परंतु, आंदोलनावर विद्यार्थी ठाम आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज जिल्हा दौऱ्यावरती आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देवदर्शन निमित्त सोलापूर जिल्ह्यातील असून भाजपच्या अनेक नेत्यांच्या त्या भेटीगाठी घेणार आहेत.

from maharashtra https://ift.tt/aGdOz4L
22 February Headlines : सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा दुसरा दिवस, ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी; आज दिवसभरात
February 21, 2023
0
Tags