Pune Bypoll election : पुण्यातील कसबा पेठ (Pune bypoll election) आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजपासून धुरळा उडणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांच्या सभा होणार आहेत. याबरोबरच निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार आहे.

ठाकरे गट आज सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला दिल्यामुळं ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमदारांसोबत बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची आज तातडीची बैठक बोलवली आहे. सकाळी 9.30 वाजता बाळासाहेब भवन येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत कार्यकरणी कधी बोलवायची ? आयोगाच्या निकालानंतर पुढची रणनिती काय असेल यावर चर्चा होणार आहे.

हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यांची सभा

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह युतीच्या नेत्यांची एकत्रित सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता कसब्यात ही सभा होईल.

रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रोड शो

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रोड शो आणि बाईक रॅलीच आयोजन करण्यात आलंय. संध्याकाळी पाच वाजता बाईक रॅलीला सुरूवात होईल..

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे ओबीसी महासंघ आणि वंचित बहूजन आघाडीची 'ऐतिहासिक परिषद'

आज अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे ओबीसी महासंघ आणि वंचित बहूजन आघाडीची 'ऐतिहासिक परिषद' होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही परिषद होणार आहे. वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या परिषदेला संबोधित करणार आहेत. अकोल्यासह बाजूच्या वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातून किमान 30 ते 35 हजार लोकांचं नियोजन वंचितनं यासाठी केल आहे.

जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा

अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा आहे. सोमवती यात्रेनिमित्त सकाळी पालखीतून खंडेरायाला 7 वाजता कऱ्हा नदीवर कऱ्हा स्नानासाठी नेण्यात येईल. सकाळी 11 वाजताच्या दरम्यान काऱ्हा स्नान होईल. या सोहळ्यासाठी हजारो भाविक जेजुरीत दाखल होत असतात.

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

आज सकाळी 10 वाजता बालगंधर्व चौक येथे एमपीएससी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थिती राहणार आहेत.

नाना काटे यांच्या प्रचारासाठी सभा

चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव, माजी मंत्री धनंजय मुंडे यांची सायंकाळी 5 वाजता एकत्रित सभा होणार आहे.

सांगलीत सहकारमहर्षी गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता सोहळा

सांगलीत सहकारमहर्षी गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एच. के. पाटील उपस्थित राहणार आहेत. तरुण भारत स्टेडियमवर सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रजनीताई पाटील, खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ उपस्थित रहाणार आहेत.

अंबादास दानवे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ईगतपुरीतील जिंदाल पॉलिमर कंपनीतील आग दुर्घटना स्थळाची दुपारी तीन वाजता पाहणी करणार आहेत. तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी जिंदाल कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहेत.

प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची सकाळी 11 वाजता अकोला येथे महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद

एकनाख खडसे यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यावर सुनावणी

भोसरी जमीन घोटळा प्रकरणी एकनाख खडसे यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यावर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. तपासयंत्रणा खटल्यात जाणूनबुजून विलंब करत असल्याचा खडसेंच्या वकीलानं कोर्टात दावा केलाय. तर राजकीय हेतूने आपल्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा खडसेंनी याचिकेतून आरोप केलाय.

from maharashtra https://ift.tt/m9oLB4q
20 February Headlines : ठाकरे गट सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार , कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार; आज दिवसभरात
February 19, 2023
0
Tags