Weather Update News : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) तर ढगाळ वातावरण जाणवत आहे. सध्या उत्तर भारत (North India) चांगलाच गारठला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर भारतात पारा घसरला, सफदरगंजमध्ये मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद

देशातील अनेक भागात तापमानाचा (Temperature) पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. तर मंगळवारी (10 जानेवारी) थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सफदरगंजमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. सफदरगंजमध्ये 1.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे. राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पुढील दोन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता

महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तापमानात घट

नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागात तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून गारठा वाढला आहे. दुपारपर्यंत वातावरणात गारठा राहत असल्याने नागरिकांना शकोटयांचा आधार घ्यावा लागत आहे. तर सपाट भागात तापमान 11 अंश सेल्सिअस आहे.पारा खाली आल्याने कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठला आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये कडाक्याच्या थंडी सोबत दाट धुके पाहण्यास मिळत आहे. पर्यटकांनी नेहमी गजबजलेला यशवंत तलाव परिसर थंडीमुळे सकाळी ओस पडल्याचे चित्र आहे.

परभणीत तापमान 5.7 अंश सेल्सिअसवर

परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे.यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी म्हणजे 5.7 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद आज झाली आहे. त्यामुळे परभणी करांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.

निफाडचा पारा 5 अंशांनी घसरला

निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी 10 अंश सेल्सिअस असणारे तापमान आज 5 अंशावर गेला आहे.

from maharashtra https://ift.tt/03gnMsD
Weather Update : देशातल्या पाच राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट; महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज
January 08, 2023
0
Tags