Ads Area

Sushma Andhare: उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंची उडी; अमृता फडणवीस, केतकी चितळे अन् कंगनाचे फोटो शेअर करुन म्हणाल्या...

Sushma Andhare: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)आणि अभिनेत्री   उर्फी जावेद  (Urfi Javed) यांचा सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्या ट्वीटला उर्फीनं प्रत्युत्तर दिलं होतं. आता ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 'नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो.' असं या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी लिहिलं.

सुषमा अंधारे यांनी कंगना रनौत, अमृता फडणवीस आणि केतकी चितळे यांचे काही फोटो शेअर केले. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,   'मी साडी नेसते.  मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट'

पुढे पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी लिहिले, 'पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो.  कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते.'

'अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी?  उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?  आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना)  मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.', असंही या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी लिहिलं.

उर्फीच्या विरोधात मुंबईतल्या महिला सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. उर्फी ही सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करत आहे. त्यामुळे समाजातील तरुण मुले मुली यांच्यावर प्रभाव पडत आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सक्त कारवाई करावी, अशी मागणी या सामाजित संस्थांनी केली आहे.  मराठा प्रतिष्ठान,गायत्री महिला सामाजिक विकास संस्था,पंचशील महिला सहकारी संस्था, संजीवनी महिला प्रतिष्ठान,साहियार महिला संस्था या संस्था उर्फीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.

<a href="https://ift.tt/S3JVPNq Javed: 'जेव्हा ती सापडेल, त्या दिवशी तिचं थोबाड रंगवेन'; उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक

from maharashtra https://ift.tt/DIZH0uS

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area