Ads Area

Sugar Production : गोडी वाढली! साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ, यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज; महाराष्ट्रातील स्थिती काय?

Sugar Production : सध्या देशात ऊसाचा गळीत हंगाम (sugarcane season) सुरु आहे. हंगाम सुरु असतानाचं एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) मोठी वाढ झाली आहे. या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील साखरेचं उत्पादन 120 लाख टनांवर गेलं आहे. यावरुन देशातील साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे समजते. देशातील विविध राज्यात साखरेचं बंपर उत्पादन झालं आहे. त्यामुळं सध्या साखरेचा विक्रमी साठा झाला आहे.

कारखान्यांची संख्या वाढली, साखरेचं उत्पादनही वाढलं

विविध पिकांच्या उत्पादनात भारताचा जगातील अव्वल देशांमध्ये वरचा क्रमांक लागतो. सध्या देशात साखरेचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याचे चित्र आहे. चालू ऊस गाळप हंगामाच्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबरची आकडेवारी समोर आली आहे. या तिमाहीमध्ये साखरेचं विक्रमी उत्पादन झालं आहे. देशातील साखरेचे उत्पादन 3.69 टक्क्यांनी वाढून 120.7 लाख टन झाले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशन अर्थात इस्माने याबाबतची माहिती दिली आहे. भारत हा साखर उत्पादन करणारा जगातील आघाडीवरचा देश आहे. गेल्या वर्षी याच हंगामात 116.4 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यात यंदा वाढ झाली आहे. साखर कारखानदारांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी 500 साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप केले होते. तर यंदा ते 509 साखर कारखान्यांकडून ऊसाचं गाळप सुरु आहे.

महाराष्ट्रातील साखर उत्पादनाची स्थिती काय?

इंडियन शुगर मिल असोसिएशन अर्थात इस्माने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील साखर उत्पादन 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत 45.8 लाख टनांवरून 46.8 लाख टनांपर्यंत वाढले आहे. उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन 30.09 लाख टनांवर पोहोचले आहे. कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 26.01 लाख टनांच्या तुलनेत 26.27 लाख टनांवर गेले आहे. गुजरातमध्ये 3.8 लाख टन, तामिळनाडूमध्ये 2.6 लाख टन आणि इतर राज्यांमध्ये 9.9 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. दरम्यान साखरेच्या उत्पादनाची ही आत्तापर्यंतची आकडेवारी आहे. आणखी यामध्ये वाढ होणार आहे. कारण सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु आहे. पुढचे दोन ते तीन महिने ऊसाचा गळीत हंगाम सुरु राहणार आहे. त्यामुळं उत्पादनात वाढ होणं अपेक्षीत आहे.

2022-23 मध्ये 365 लाख टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज

गेल्या वर्षात  म्हणजे 2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये साखरेचे उत्पादन वाढण्याचा अंदाज इस्माने (ISMA) वर्तवला आहे. 2021-22 मध्ये साखरेचे उत्पादन हे 358 लाख टन झाले होते. आता हे उत्पादन 2022-23 मध्ये 365 लाख टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज इस्मानं व्यक्त केला आहे. साखरेच्या चांगल्या उत्पादनाची स्थिती पाहता केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात करेल असा अंदाज आहे. निर्यातीचा कोटाही निश्चित केला जाईल. 2021-22 मध्ये भारताने विक्रमी 111 लाख टन साखर निर्यात केली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/2ECLlK0 Mushrif : ऊस तोडणी मुकादमांवर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा; हसन मुश्रीफ यांची अधिवेशनात मागणी

from maharashtra https://ift.tt/wLzNSo5

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area