Pune Fire : पुण्यातील (Pune) सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ MNGLची गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. ही घटना रात्री 12 वाजण्याच्या घडली. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळं जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत आहेत. अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरु असल्यानं आग आटोक्यात येत नाही. या घटनेमुळं सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक थांबवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूने वाहने जात आहेत.

अचानक गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ घडली. त्यानंतर मोठी आग लागली. यामुळं एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनेचीमाहिती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

नर्हे आंबेगाव परिसरातील एका भंगाराच्या गोडाऊनला आग

गॅसची पाईपलाईन फुटल्याच्या घटनेबरोबरच पुण्यातील नर्हे आंबेगाव परिसरातील एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 10 गाड्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. या भागात अनेक लहान लहान औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या जवळ असलेल्या भंगाराच्या गोडाऊनला आग लागली आहे.

from maharashtra https://ift.tt/vDBfFrt
Pune Fire : पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटली, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु
January 12, 2023
0
Tags