<p>राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काल, आज आणि उद्या भाजपचेच असल्याचं वक्तव्य करुन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी खळबळ उडवून दिल्यानं राष्ट्रवादीमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे... महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांच्या मित्रपक्षांनी घटकपक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांवर बोलताना सांभाळून बोलावं, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे... इतकंच नाही.. तर तिकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनाच अल्टिमेटम दिलं आहे... उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत ठोस भूमिका ठरवून घटकपक्षांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे... वंचित आघाडीने शिवसेनेशी युती केलेल्या चौथ्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरु झाल्या आहेत... </p>
from maharashtra https://ift.tt/R5GvEZi
Maharashtra : प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांबाबत वक्तव्य, राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरेंना सल्ला
January 26, 2023
0
Tags