Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यात रंगणार आहे. शिवाय आज भोगी दिवशी राज्यभरातील हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी पुरुषांनी मंदिरात आल्यास केवळ मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुण्यात रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा फायनल थरार

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यात रंगणार आहे. पुण्यात सुरु असलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागातील अंतीम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. तर माती विभागातील अंतीम लढत सोलापुरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. या दोन अंतीम लढतींमधील विजेते महाराष्ट्र केसरीच्या अंतीम लढतीत खेळणार आहेत. शनिवारी संध्याकाळी आधी अनुक्रमे मॅट आणि माती विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात येतील आणि यातील विजेत्यांमधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत खेळवण्यात येईल. नांदेडचा शिवराज राक्षे हा यावेळच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जातोय. दुखापतीतून सावरत शिवराजने मॅट विभागाची अंतीम लढत गाठलीय. इथे त्याची लढत 2019 चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्याशी होणार आहे.

औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा नामविस्तार दिन

आज औरंगाबाद विद्यापीठ नामविस्तार दिन आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक आणि नेते उपस्थित असतात. या निमित्ताने आज महाविकास आघाडीकडून एक सभा घेतली जाणार आहे. त्यासाठी कॉंग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेना नेते अंबादास दानवे, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, नितीन राऊत, चंद्रकांत हांडोरे, सुषमा अंधारे , रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.

पंढरपुरात भोगीनिमित्त रूक्मिणी मातेला भोगी करणार

आज भोगी दिवशी राज्यभरातील हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी पुरुषांनी मंदिरात आल्यास केवळ मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

from maharashtra https://ift.tt/0NtDQhl
Maharashtra News Updates: देश-विदेशातील ताज्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
January 13, 2023
0
Tags