Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात आज निकाल लागणार आहे. 92 नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिका मधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख अमरावती येथील एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाणार आहेत.

शिवसेना कोणाची आज ठरणार? आयोगात दुपारी 4 वाजता सुनावणी

शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात आज निकाल लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपतीये. त्यामुळे ठाकरे गटाकडून निकाल द्या किंवा संघटनात्मक निवडणुकीची परवानगी मागितली आहे. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं सादर केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

92 नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिका मधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे.

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना आज एसीबी समोर हजर रहाणार

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख अमरावती येथील एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाणार आहेत. देशमुख यांना एसीबीच्या अमरावती विभागीय कार्यालयाने 17 जानेवारीला अमरावती येथे हजर होण्याचे समन्स बजावले होते. नितीन देशमुख आज चौकशीसाठी निघताना शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

आज वाशिम बंदची हाक
शिरपूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आज वाशिम बंदची हाक देण्यात आलीय. शिरपूर येथील एका विशिष्ट समाजातील युवकाने व्हाट्सअप तथा इंस्टाग्रामवर माळी समाजाबद्दल धार्मिक भावना दुखावणारे अपशब्द आणि पोस्ट व्हायरल केल्याबद्दल वाशिम शह आज बंद राहणार आहे. संबंधित युवकावर त्वरित कारवाई करावी तसेच सर्वांनी आज बंद पाळावे असं माळी समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

वारणा धरणग्रस्तांचा मोर्चा
वारणा धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीच्या इस्लामपूर मध्ये धरणग्रस्तांनी थेट तहसील कार्यालयासमोर धडक मोर्चा काढणार आहेत. बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होणार आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून कब्जा पट्टीच्या बाबतीत लादण्यात आलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

देशातील पहिली धम्म पदयात्रा आज प्रस्थान करणार

आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ, थायलंड येथील 110 भिक्खूंचा सहभाग असलेली देशातील पहिली धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी, दादर मुंबईपर्यंत आज प्रस्थान करणार आहे. शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान येथून ही धम्म पदयात्रा मुंबई कडे रवाना होणार आहे. यात आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ, थायलंड येथील 110 भिक्खूंचा सहभाग असुन प्रथमच तथागत गौतम बुद्धांचे अस्थिदर्शन हि घेता येणार आहे. हि पदयात्रा पुढेच महिनाभर परभणी ते मुंबई 500 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

केतकी चितळेच्या याचिकेवर सुनावणी
गुन्हा रद्द करण्यासाठी केतकी चितळेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. या प्रकरणात शरद पावर यांनाही प्रतिवादी करण्यासाठी केतकीचा हायकोर्टात अर्ज. सोशल मीडियावर जर ती पोस्ट शरद पवारांशी संबंधित होती, तर मग शरद पवारांनी एकही तक्रार का दाखल केली नाही? केतकीचा सवाल.

from maharashtra https://ift.tt/wy821L4
Maharashtra News Updates 17 January 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
January 16, 2023
0
Tags