ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.

आज विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग असणार आहे. तर, आज जिजाऊ जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्यावतीने आज वार्षिक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी महत्त्वाची माहिती भारतीय लष्कराकडून दिली जाण्याची शक्यता आहे.

> जिजाऊ जयंती निमित्ताने कार्यक्रम:

सिंदखेड राजा येथे 425 वा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा जिजाऊ स्ष्टीत होणार आहे. सकाळी 6 वाजता महापूजा होणार आहे. सकाळी 7 वाजता दिंडी निघणार आहे. सकाळी 9 वाजता शिवधर्म ध्वजारोहण होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत सास्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

> विधान परिषद उमेदवारी अर्ज

मुंबई – विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. भाजप शिंदे गटाच्या सोबत बच्चू कडू ही जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी कोण कोण उमेदवारी अर्ज भरणार हे पहाण महत्वाचं राहील.

> राष्ट्रगीताचा अवमान प्रकरण, याचिकेवर आज निकाल अपेक्षित

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज निकाल अपेक्षित याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावण्याच्या निर्णयाला त्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. त्यावरील दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गेल्या आठवड्यात आपला निकाल राखून ठेवला. त्याबाबत आज निकाल येण्याची शक्यता आहे.

- टॉप्स सिक्युरीटज प्रकरणी मुंबई पोलिसांनी सादर केलेला सी समरी अहवाल स्वीकारू नये यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 12 जानेवारीपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अमित चांडोले आणि एम शशिधरन यांना हायकोर्टानं जामीन दिला आहे. अमित चांदोले हे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय आहेत.

नाशिक – नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेंस कायम आहे. आज सुधीर तांबे दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे. भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत उशिरा नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

from maharashtra https://ift.tt/A3mYh5E