Ads Area

Headlines 27 January : शिवसेना नेते आनंद दिघे यांची जयंती,  शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर, आज दिवसभरात

Headlines 27 January : शिवसेना नेते आनंद दिघे यांची आज जयंती असल्याने ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी एक दिवसीय संपावर जातील.

आनंद दिघे यांची जयंती (Anand Dighe birth anniversary)

शिवसेना नेते आनंद दिघे यांची आज जयंती असल्याने ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आणि शक्तिस्थळ येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक असे नेते देखील येणार आहेत.

बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी आजपासून संपावर (Bank of Maharashtra employees strike)
बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी एक दिवसीय संपावर जातील. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या 700 शाखा आणि 13 हजार कर्मचारी संख्या आहेत. सध्याची असलेली कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतोय. मात्र बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नसल्याचा बॅंक संघटनेचा आरोप आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार ( PM Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ च्या सहाव्या भागात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा सहभाग असणार आहे. यंदा ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुमारे 38.80 लाख विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी यासाठी नोंदणी केली आहे. राज्यातील शाळांमध्ये सुद्धा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवला जाणार आहे.

शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर  ( sharad pawar And nitin gadkari )

स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त कुंडल या ठिकाणी उभारण्यात आलेल्या क्रांती अग्रणी स्फूर्तीस्थळाचा लोकार्पण शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, सांगलीचे खासदार संजय काका पाटील,  जिल्ह्यातले आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

"सेक्सेल सीमेन जेनेटिक" प्रयोगशाळेचे उद्घाटन

चितळे डेअरी यांच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठे "सेक्सेल सीमेन जेनेटिक" प्रयोगशाळा उभारण्यात आलीये. याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनात 12 कोटींचा रेडा

भीमा कृषी प्रदर्शनात आज मुख्य आकर्षण असलेला 12 कोटींचा रेडा आणला जाणार आहे.

from maharashtra https://ift.tt/3Sgq7o1

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area