Ads Area

Cotton Prices : कापसाच्या दरात वाढ होणार? पण कधी? वाचा सविस्तर

Cotton Prices : सध्या महाराष्ट्रासह (Maharashtra) पंजाबमध्ये कापसाच्या दरात (Cotton Prices) सातत्यानं घसरण होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अभ्यासकांच्या माहितीनुसार कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली होती. यावर्षी देखील मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

अतिवृष्टी, पूर, परतीचा पाऊस यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. हाती आलेली शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त झाली होती. बिहार, झारखंडमध्ये पीके दुष्काळाच्या तडाख्यात सापडली होती. त्याचवेळी खरीप हंगामाच्या अखेरीस झालेल्या पावसानं कापसाबरोबरच भातशेतीच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं. या नैसर्गीक आपत्तीतून दिलासा मिळाल्यावर पिकांवर कीड रोगांचाही प्रादुर्भाव झाला होता. यामुळं उत्पादनात मोठी घट झाली आहे. सध्या महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कापसाचे दर घसरले आहेत. क्विंटलमागे दोन हजार रुपयांहून अधिकची घट झाली आहे. मात्र, लवकरच कापसाच्या दरात वाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं अभ्यासकांनी म्हटलंय.

प्रतिक्विंटल कापसाला 11 हजार रुपयांहून अधिकचा दर मिळण्याची शक्यता

बाजारात अजूनही कापसाच्या दरात घसरण असल्याचे जाणकारांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत कापसाचे दर वाढले होते. यंदाही मार्च-एप्रिलमध्येच कापसाचे भाव वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. शेतकरीही मार्च-एप्रिलपर्यंत वाट पाहत आहेत. कापसाच्या भावात प्रतिक्विंटल 11 हजार रुपयांहून अधिक वाढ होऊ शकते, असे शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे. ज्या शेतकऱ्यांकडं कापूस ठेवायला जागा नाही, ते शेतकरी स्वस्त दरात कापूस विकत आहेत.

सध्या कापसाला  7 हजार 500 ते 8 हजार 200  रुपयांचा दर

दरम्यान, केंद्र सरकारनं कापसाची किमान आधारभूत किंमत 6 हजार 380 रुपये निश्चित केली आहे. या एमएसपीला शेतकरी अपुरे किंमत म्हणत आहेत. एवढ्या रकमेवर कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले. दर कमी असल्यामुळं बाजारात विक्रीसाठी कमी कापूस जात आहे. सध्या 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे. येत्या काही दिवसांत कापसाची मागणी वाढल्यास त्याचे दरही सुधारतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/Q5uPSHJ Agitation : 47 वर्षानंतर बहिरममध्ये कापूस आंदोलनाची ठिणगी, कापूस जाळून शेतकऱ्यांनी केला सरकारच्या धोरणाचा निषेध

from maharashtra https://ift.tt/bU8Cv1W

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area