Buldana Agriculture News : राज्यात हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं (Rain)देखील हजेरी लावली आहे. अशा वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाणा (Buldana) जिल्ह्यात गुरुवार (27 जानेवारी) पावसानं हजेरी लावल्यानंतर आज जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळं पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर काल अनेक भागात अवकाळी पाऊस पडला आहे. तर आज सकाळी जिल्ह्यात सर्वत्र दाट धूक्याची चादर बघायला मिळत आहे. धुक्यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सध्या कांदा लागवडीचे (Onion Cultivation) दिवस आहेत. त्यामुळं नुकताच लागवड करण्यात आलेल्या कांद्यावर अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळं अनेक रोगांचा हल्ला होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच गहू, हरभरा या पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे.

Buldana Rain : या भागात झाला होता पाऊस

जिल्ह्यातील चिखली, देऊळगाव राजा, संग्रामपूर, जळगाव जामोद , मेहकर या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकरी मात्र चिंतेत आहेत. या पावसाचा रब्बी पिकांना मोठा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांदा, हरभरा तसेच गहू या पिकांवर या पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. गहू पीक अनेक भागात चांगलं असलं तरी त्यावर वातावरणाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असल्यानं तापमानातही मोठी घट झाली आहे. अनेक भागात धुक्याची दाट चादर आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादनात खर्चात मोठी वाढ

सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळं आणि पिकांवर पडत असलेल्या रोगराईमुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. तसेच उत्पन्नात मोठी घट होत आहे. यामुळं शेतकरी वारंवार संकटात सापडत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि रोगराईमुळं अनेक भागात पिके वाया गेली होती. त्यामुळं शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बी हंगामातील पिकांकडे होती. परंतू, वारंवार बदलत असलेलं वातावरणामुळं पिकांवर अनेक विषाणूजन्य रोग पडत आहे. त्यामुळं शेककरी चिंतेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/gRqGWCy Rain : बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता

from maharashtra https://ift.tt/HVpxwqe
Agriculture News : पावसानंतर आता दाट धुक्याची चादर, पिकांवर रोगराई पडण्याची भीती; बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत
January 26, 2023
0
Tags