10 January Headlines : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. याबरोबरच शिवसेना कुणाची? यावर निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. शिवाय आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. याबरोबरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज नागपुरात होणार आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाऐवजी सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने सुप्रिम कोर्टाकडे केलीये. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णमुरारी, न्या. हिमा कोहली, न्या.पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

शिवसेना कुणाची? यावर केंद्रीय निवडणूक आयोगत सुनावणी

ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? यावर निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं सादर केली आहे. त्यामुळं आता पक्षावर हक्क कोणत्या गटाचा असणार, याबाबत निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे.

आज वर्षातली पहिली आणि शेवटची अंगारकी चतुर्थी

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी रांगेत उभे रहातात. अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धीविनायकाचे दर्श घेण्यासाठी मुंबईज्या आसपारच्या परिसरातून लोक येत असतात.

राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक पार पडेल या बैठकीमध्ये आगामी विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये चर्चा करण्यात येईल. सध्या राष्ट्रवादीच्या कोट्यात असणाऱ्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी विक्रम काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर मित्र पक्ष शेतकरी कामगार पक्षाला कोकण शिक्षक मतदार संघासाठी बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अद्याप अमरावती आणि नागपूरच्या जागांचे उमेदवार ठरलेले नाहीत.

नागपुरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज नागपुरात होणार आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन करण्यात येणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी एच. के. पाटील, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित रहाणार आहेत.

मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर डोळ्याचे ऑपरेशन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात एका डोळ्याचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. यासाठी शरद पवार सकाळी रुग्णालयात दाखल होणार आहे.

जोशीमठवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याप्रकरणी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीये. या याचिकेत प्रभावित क्षेत्रात लोकांना अर्थ सहाय्य, संपत्तीचा विमा उतरवण्याची मागणी करण्यात आलीये.यावर आज सुनावणी होणार आहे.

पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरूवात
65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.

from maharashtra https://ift.tt/wxSsb5m
10 January Headlines : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी, शिवसेना कुणाची? यावर केंद्रीय निवडणूक आयोगत सुनावणी; आज दिवसभरात
January 09, 2023
0
Tags