Ads Area

1 february In History : अंतराळवीर कल्पना चावलाचा मृ्त्यू, बॉलिवूडच्या जग्गूदाचा वाढदिवस; आज इतिहासात

1 february In History : इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. काही घटना अशा असतात की ज्याचा परिणाम देशाच्या समाजकारणावर-राजकारणावरही दीर्घकाळ राहतो. 1 फेब्रुवारीचा दिवस जगातील अंतराळ शास्त्रज्ञांसह सर्वांसाठीच हृदय पिळवटून टाकरणारा ठरला. आजच्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी 2003 रोजी अमेरिकेचे स्पेस शटल कोलंबिया आपली अंतराळ मोहीम पूर्ण करून परतत असताना क्रॅश झाले आणि त्यातील सर्व सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अंतराळवीर कल्पना चावला यांचाही मृत्यू झाला. याबरोबरच आज भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस आहे.

1831 : कलकत्ता येथे पहिले ललित कला प्रदर्शन भरवले गेले

कलकत्ता येथे 1 फेब्रुवारी 1831 रोजी पहिले ललित कला प्रदर्शन भरवले गेले. त्यानंतर भारत सरकारने 1954 मध्ये नवी दिल्ली येथे 'नॅशनल अॅकॅडमी ऑफ आर्ट्स'ची स्थापना केली. ज्यामुळे देश-विदेशात भारतीय कलेची समज आणि प्रचार वाढला.

1855 : ईस्ट इंडिया रेल्वेचे औपचारिक उद्घाटन

1  फेब्रुवारी 1855 रोजी ईस्ट इंडिया रेल्वेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याला प्रथम ईस्ट इंडियन रेल्वे कंपनी म्हटले जात असे. नंतरच्या काळात हे नाव बदलून ईस्ट इंडियन रेल्वे असे नाव देण्यात आले. 1 जून 1845 रोजी लंडनमध्ये चाळीस दशलक्ष पौंडांच्या भांडवलासह कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1855 रोजी भारतात त्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

1881 : दिल्लीत सेंट स्टीफन्स कॉलेजची स्थापना

सेंट स्टीफन्स कॉलेजची स्थापना 1 फेब्रुवारी 1881 रोजी झाली. हे दिल्लीतील सर्वात जुने कॉलेज आहे. हे कॉलेज NAAC द्वारे 'A' ग्रेडसह मान्यताप्राप्त आहे आणि दिल्ली विद्यापीठाशी संलग्न आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2018 द्वारे महाविद्यालयाच्या श्रेणीमध्ये महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक देण्यात आला आहे. सेंट स्टीफन्स विविध विभागांसह BA, B.Sc, MA आणि M.Sc सारख्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. कॉलेजमध्ये रसायनशास्त्र, इंग्रजी, संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, हिंदी, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, संस्कृत आणि शारीरिक शिक्षण विभाग आहेत. शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयासाठी कॉलेज क्लब आहे.

1922 : महात्मा गांधींनी व्हाईसरॉयला पत्र लिहिले

महात्मा गांधींनी आजच्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी 1922 रोजी भारताच्या तत्कालीन व्हाईसरॉयला पत्र लिहून सांगितले की ते त्यांच्या चळवळीला गती देत ​​आहेत आणि असहकार चळवळ ही आता सविनय कायदेभंगाची चळवळ असेल. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पूर्ण स्वराज्य मिळविण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीने हे सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली  होती.

1971 :   भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांचा वाढदिवस

अजय जडेजा यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1971 रोजी जामनगर (गुजरात ) येथे एका राजपूत कुटुंबात झाला. 1992 ते 2000 पर्यंत ते भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू होते. त्यांने 15 कसोटी सामने आणि 196 एकदिवसीय सामने खेळले. मॅच फिक्सिंगप्रकरणी त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 27 जानेवारी 2003 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील बंदी रद्द केली आणि त्यांला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली. त्यांनी एका हिंदी चित्रपटातही काम केले आहे.

1960 :  अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस

ऐंशी, नव्वदच्या दशकामधील सुपरहीट अभिनेत्यांच्या यादीमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे नाव टॉपला आहे. जवळपास चार दशकं सिनेसृष्टीमध्ये काम करत प्रेक्षकांना त्यांनी आपलसं केलं. इतकच नव्हे तर रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारत त्यांनी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्या गाजवलं.  ‘सौदागर’, ‘राम लखन’, ‘रंगीला’, ‘बॉर्डर’, ‘रुप की राणी चोरों का राजा’ असे अनेक चित्रपट सुपरहीट हिंदी चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. त्यांच्या चित्रपटांमधील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. जग्गु दादा म्हणून त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण झाली आणि त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका अगदी आजही प्रसिद्ध आहेत.

1977 : नवी दिल्ली येथे भारतातील पहिल्या राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची स्थापना

रेल संग्रहालय हे दिल्लीतील सर्वात प्रसिद्ध आणि भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. हे रेल्वे संग्रहालय 10 एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रात हिरव्यागार बागांच्या मध्यभागी वसलेले आहे. यातून रेल्वेचा समृद्ध प्राचीन वारसा पाहायला मिळतो. 1 फेब्रुवारी 1977 रोजी या रेल्वे संग्रहालयाची स्थापना झाली. रेल्वे संग्रहालयाची स्थापना प्रामुख्याने भारताचा 163 वर्ष जुना रेल्वे वारसा जतन करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. ज्यामध्ये भारतीय रेल्वेच्या पुरातन वस्तू, फर्निचरसह 100 हून अधिक वस्तू पाहता येतील. रेल्वे संग्रहालय दिल्ली आपल्या पर्यटकांसाठी 3D आभासी ट्रेन राइड, स्टीम लोको सिम्युलेटर, टॉय ट्रेन आणि इनडोअर गॅलरी सुविधा देखील देते. या व्यतिरिक्त संग्रहालयात 200 लोकांच्या आसनक्षमतेचे सभागृह देखील आहे, जेथे कार्यशाळा आणि माहितीपट दाखवले जातात.

1979 : इराणचे आध्यात्मिक नेते अयातुल्ला खामे हे 14 वर्षानंतर मायदेशी परतले

1964 मध्ये इराणचे आध्यात्मिक नेते अयातुल्ला कामे यांना देशातून हाकलून दिण्यात आले होते.  त्यामुळे ते फ्रान्सला गेले. त्यानंतर 1973 मध्ये जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे इराणच्या पंतप्रधानांविरोधात लोक रस्त्यावर उतरले.  सप्टेंबर 1978 मध्ये हजारो लोक पंतप्रधानांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमले. यामुळे घाबरलेल्या पंतप्रधान शाह मोहम्मद रेसा पहलेवी यांनी इराणमध्ये मार्शल लॉ लागू केला. शहांच्या या हुकूमशाही वृत्तीनंतर परिस्थिती सतत शहांच्या नियंत्रणाबाहेर जात होती. जनता रस्त्यावर उतरून खामेनी यांना परत बोलावण्याची मागणी करत होती. ही निदर्शने इतकी वाढली होती की त्यापुढे मार्शल लॉ अपुरा ठरत होता. इराणचे राज्यकर्तेच नव्हे तर प्रशासन आणि लष्करही हैराण झाले होते. त्यामुळे आपल्यासोबत काही अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने शाह  16 जानेवारी 1979 रोजी इराणची सत्ता शापूर बख्तियारकडे देऊन अमेरिकेत पळून गेले. त्यानंतर लोक अयातुल्ला यांना परत बोलवण्याची मागणी करू लागले. त्यामुळे 1 फेब्रुवारी 1979 रोजी ते फ्रान्सहून मायदेशी परतले.

2002 : अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लची दहशतवाद्यांनी हत्या केली

डॅनियल पर्ल हे अमेरिकन पत्रकार होते. वॉल स्ट्रीट जर्नलचे रिपोर्टर डॅनियल पर्ल 2002 मध्ये कराचीमध्ये एका कथेचे कव्हरेज करत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर त्याची हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह कराचीच्या हद्दीत सापडला. त्यावेळी या हत्येचा तपास केल्यानंतर त्यात मुस्लिम दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या केली आणि त्यांचे कापलेले डोके घेऊन व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. सुमारे एक महिन्यानंतर हा व्हिडीओ कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाला पाठवण्यात आला होता. या प्रकरणाने संपूर्ण जग हादरले होते.

2003 :  अंतराळवीर कल्पना चावलाचा मृत्यू

2003 मध्ये या तारखेला अमेरिकेचे स्पेस शटल कोलंबिया आपली अंतराळ मोहीम पूर्ण करून परतत असताना क्रॅश झाले आणि त्यातील सर्व सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अंतराळवीर कल्पना चावला यांचाही मृत्यू झाला. मिशन स्पेशालिस्ट म्हणून कोलंबियाला गेलेल्या कल्पना यांचा जन्म 1 जुलै 1961 रोजी भारतातील कर्नाल (हरियाणा ) येथे झाला. पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

2004 : सौदी अरेबियात हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत 250 हून अधिक मृत्यू

1 फ्रेब्रुवारी 2004 रोजी सौदी अरेबियात हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर या घटनेत 244 जण जखमी झाले होते.

2006 : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा पोलिओ अहवाल

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने इजिप्त आणि नायजरमधून पोलिओचे समूळ उच्चाटन झाल्याचा अहवाल दिला. याशिवाय त्यावेळी पोलिओ फक्त भारत, अफगाणिस्तान, नायजेरिया आणि पाकिस्तानमध्ये असल्याचे सांगितले. शिवाय काही देशांमध्ये पोलिओचा संसर्ग पुन्हा झाल्याची माहिदी दिली.

2009 :  टेनिस स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळाले

महेश भूपती आणि सानिया मिर्झा या भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत 1 फ्रेब्रुवारी 2009 रोजी प्रथमच मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

from maharashtra https://ift.tt/19zEpYy

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area