Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; 93 जागांवर आठशेच्यावर उमेदवार रिंगणात

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर हे मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या जिल्ह्यातील हे 93 मतदारसंघ आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची पहिली बैठक आज

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आज सकाळी बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अशावेळी आज संध्याकाळी पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला ठाकरे गटातील नेते उपस्थित राहणार का हा देखील एक सवाल आहे. कारण वंचित बहुजन आघाडी सोबत ठाकरे गट गेल्यास महाविकास आघाडीचे काय असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडीची आज बैठक

दरम्यान, आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. अधिवेशन काळात मांडायच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच 19 तारखेला राष्ट्रवादीच्या शेतकरी मोर्चाबाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे.

सासू विरुद्ध सून, जळगाव दूधसंघाच्या निवडणुकीत मंदाताई खडसे यांच्याविरोधातील प्रचार मेळाव्यात खासदार रक्षा खडसे सहभागी

जळगाव दूध संघ निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत म्हटली तर मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे (Manda Khadse) आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यात होत आहे. रक्षा खडसे (Raksha Khadse) या भाजपाच्या खासदार असल्याने साहजिकच त्यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने प्रचार करावा लागत आहे. याचाच अर्थ रक्षा खडसे यांनी सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्या पॅनलला विजय करण्याचा आवाहन मतदारांना केलं आहे. त्यांचे हे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे यांच्याविरोधात असल्याने सासू आणि सुनेमधील ही लढत संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे

from maharashtra https://ift.tt/1XCw8z6
Maharashtra News Updates 05 December 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
December 04, 2022
0
Tags