Ads Area

Maharashtra News Live Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.

आज पंतप्रधान मोदींची महाराष्ट्र आणि इतर दोन राज्यांच्या खासदारांशी चर्चा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि इतर दोन राज्यांच्या खासदारांशी चर्चा करणार आहेत. आज सकाळी महाराष्ट्राचे भाजप खासदार मोदींसोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. सीमावाद, राज्यपालांची वक्तव्यं यावर भाजप खासदार गाऱ्हाणं मांडणार असल्याची माहिती आहे.

श्रद्धा वालकरच्या वडिलांची पत्रकार परिषद

दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर आज तिचे वडील विकास वालकर पत्रकार परिषद घेणार आहेत. विकाल वालकर आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आफताबने मे महिन्यात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून हत्या केली होती. या हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले आणि दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या घरी 300 लिटरच्या फ्रीजमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवण्यात आले. एवढेच नाही तर आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे अवयव शहराच्या विविध भागात फेकून दिले होते.

महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट घोंगावतेय. कारण बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असे नाव दिलेय. या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ तामिळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरातलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आदेश लागू

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. आजपासून म्हणजे 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत हे आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

from maharashtra https://ift.tt/8NJwTaS

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area