Ads Area

CM Eknath Shinde : राज्यावरची सर्व संकट दूर होवो, नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावो; मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा

CM Eknath Shinde : राज्यावरची सर्व संकट दूर होवोत. प्रलंबित विकास प्रकल्प पूर्ण व्हावेत. हे नवीन वर्ष (New Year) सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या नवीन वर्षात अनेक ठिकाणी विकासाचं पर्व सुरु व्हाव, तसेच राज्यातील शेतकरी (Farmers) समाधानी व्हावा असेही मुख्यमंत्री म्हणाले. ठाण्यातील (Thane) जांभळी नाका शिवाजी मैदान येथे रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाते ते बोलत होते. दिवंगत आनंद दिघे यांनीहे रक्तदान शिबीर सुरु केले  होते.

कोरोनाच्या संकटात रक्तदानाचा विक्रम

रक्तदान हे जीवनदान आहे. न चूकता काहीजण रक्तदान करत असतात. सर्व रक्तदात्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले. रक्त हे बनवता येत नाही, त्याला रक्तदानच करावं लागतं पोलिस, जवान, महिला देखील या रक्दानाच्या उपक्रमात सहभागी होतात. आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा रक्तदानाचा उपक्रम खूप महत्वाचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या संकटात आपण याच ठिकाणी रक्तदानाचा विक्रम केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावेळी रक्तदान केलं. आनंद दिघे याच्या संकल्पनेतून नवीन वर्षाची सुरुवात ही रक्तदानपासून करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  कोरोना काळात याच ठिकाणी 11 हजाराहून अधिक जणांनी रक्तदान केलं होतं. याचा अनेक रुग्णांना फायदा झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लोकांच्या मनातील सरकार स्थापन केलं

आम्ही लोकांच्या मनातील सरकार स्थापन केलं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री यावेळी पोलिसांनी, महिलांनी देखील रक्तदान केले. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.  कोणताही गाजावाजा न करता लोक स्वतःहून रक्त दान करत आहेत. एका दिव्यांग व्यक्तीने 121 वेळा रक्तदान केले आहे. प्रकाश नाडर असे त्यांचे नाव आहे. 25 राज्यात रक्त दान केले त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/P8VWufn New Year 2023: नव्या उत्साहात, नव्या जोमात... नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत, रोषणाई अन् आतिषबाजीनं उजळला देश

from maharashtra https://ift.tt/71dqmln

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area