Ads Area

आनंद परांजपेंना अटक होणार? मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NCP Leader Anand Paranjpe: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात अपशब्द वापरणं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (National Congress Party) ठाणे जिल्हाध्यक्ष (Thane District President) आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे (NCP Thane District President Anand Paranjape) यांच्या विरोधात चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यानं हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भादंवि 153, 501, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. कल्याणमधील (Kalyan News) बाजारपेठ आणि कोळसेवाडी, डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेत. चार पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे आनंद परांजपे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ठाणे शहर (Thane News) अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी बाळासाहेबांच्या शिवसेनेने (Balasahebanchi Shivsena) आक्रमक पवित्र घेतला होता. कल्याण डोंबिवलीतील (Kalyan-Dombivli) विविध पोलीस ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद परांजपे यांच्या विरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर परांजपे यांच्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील चार विविध पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्दाचा वापर करत ट्वीट केलं होतं. या ट्वीटनंतर बाळासाहेबांची शिवसेनेनं आनंद परांजपे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेच्या निषेधार्थ परांजपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख महेश गायकवाड, शहर प्रमुख रवी पाटील, महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात परांजपे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आली होती. यासंदर्भात बाळासाहेबांचे शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काल डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. त्यांना देखील निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी पोलीस ठाणे तर डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाणे या चार पोलीस ठाण्यांत परांजपे यांच्या विरोधात भादवी 153,  501, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस पुढे काय कारवाई करणार? आनंद परांजपेंवर अटकेची कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर दाखल झालेल्या NC आता FIR मध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. व त्या Cognisable Offence मध्ये घेतल्या आहेत. आज रात्री त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 24, 2022

आपल्या राज्याची वाटचाल आता पोलीसी राज्याकडे होऊ लागली की काय? : जितेंद्र आव्हाड

आनंदर परांजपेंविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईसंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी एक ट्वीट केलं होतं. तसेच अटक करा असा इशाराही दिला होता. जितेंद्र आव्हाडांनी एक ट्वीट केलं होतं की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर दाखल झालेल्या NC आता FIR मध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. त्या Cognisable Offence मध्ये घेतल्या आहेत. आज रात्री त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली आहे." तसेच पुढे बोलताना त्यांनी, "आपल्या राज्याची वाटचाल आता पोलीसी राज्याकडे होऊ लागली कि काय? अटक कराच..." असं म्हटलं होतं.

from maharashtra https://ift.tt/Z8Ncd14

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area