Ads Area

पत्नीने आत्महत्या केल्याचं कळताच पतीचाही गळफास, नवविवाहित दाम्पत्याने संपविली जीवनयात्रा

Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोड तालुक्यातील घटांब्री येथे मनाला चटका लावणारी घटना घडली असून, आठ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या (Suicide) करत जीवनयात्रा संपविली आहे. पत्नीने राहत्या घरात तर पतीने नदीच्या पुलाखाली गळफास घेत आत्महत्या केली आहे. विकास गणपत तायडे (वय 26 वर्षे) व सपना विकास तायडे (वय 21 वर्षे ), अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील घटांब्री येथील रहिवासी विकास गणपत तायडे यांचा विवाह आठ महिन्यांपूर्वी एप्रिल 2022 रोजी दहिगाव येथील सपनासोबत विवाह झाला होता. विकास हे पोस्टमास्तर म्हणून नोकरी करत होते. दरम्यान काही दिवसांपासून ते दोघे कुटुंबीयांपासून वेगळी खोली करून अलिप्त राहत होते.सर्व काही सुरळीत सुरु असतानाच नवविवाहित दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली.

सपनाने आत्महत्या केल्याचं कळताच विकास यांचाही गळफास...

सपना आणि विकास या दोघांचाही संसार सुरू होता. दरम्यान रविवारी विकास तायडे हे सिल्लोडला आपल्या दुचाकीची सर्व्हिसिंग करण्यासाठी गेले होते. याचवेळी अचानक रविवारी सकाळी साडेअकराच्या  सुमारास सपनाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सपना यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच विकास यांना धक्का बसला. त्यामुळे त्यांनीसुद्धा रस्त्याने परत येताना अंभईजवळील बोजगाव येथील खेळणा नदीच्या पुलाखाली दुपारी 1  वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवला. तसेच घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, तपास सुरु केला आहे. दरम्यान रविवारी रात्री घटांबी येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गावात खळबळ...

आठ महिन्यापूर्वी सपना आणि विकास यांचा धुमधडाक्यात विवाह झाला होता. दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. मात्र असे असतानाच आधी सपनाने आणि त्यानंतर विकास यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. दोघांमध्ये नेमके असे काय घडलं की त्यांनी एवढ्या टोकाचे पाऊल उचलेले याबाबत गावात चर्चा सुरु आहे. तर या नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याने तायडे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर गावात देखील सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Aurangabad Crime: पत्नीच्या तक्रारीनंतर पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, महिलेच्या माहेरी जाऊन केला अत्याचार

from maharashtra https://ift.tt/SOIdykr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area