Threat from BJP MLA : माजी मंत्री तथा भाजप आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) यांची आणखी एक ऑडिओ क्लिप वायरल (Audio Clip Viral) झाली असून या क्लिपमध्ये महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला त्यांनी अधिवेशनात एका मिनिटात निलंबित करण्याची धमकी दिली आहे, शिवाय 'साहेब म्हणून सांगितलेलं कळत नसेल, तर आपल्या कर्माची फळे भोगायला तयार राहा' असा इशाराच त्यांनी महावितरणच्या अभियंत्याला दिला आहे. यापूर्वी देखील लोणीकरांच्या अनेक वादग्रस्त क्लिप व्हायरल झाल्यात. यावेळी त्यांनी अभियंत्याला दिलेली ही धमकी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतेय..

नेमके या व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये काय संभाषण आहे?

*अभियंता*- हॅलो

*लोणीकर*- हॅलो

*अभियंता* - हा सर..

*लोणीकर*.- गावच्या डीपी बंद करणं...बंद करा ना..

*अभियंता* -बरचसं रिकव्हर केलंय...

*लोणीकर* - तुम्हाला हात जोडून सांगितलं, साहेब म्हणून सांगितलं, मराठी भाषेत सांगितल, वारंवार सरकार सूचना देतेय, राज्याचे ऊर्जामंत्री-उपमुख्यमंत्री सांगत आहेत, वीज वितरण कंपनीने आदेश काढलेत लेखी, एका डी पी वर एका माणसाने विजेचा बिल भरलं तरी डीपी बंद करायची नाही.

*अभियंता* - हो सर......

*लोणीकर* - तुम्ही कुठल्या नशेत आहात.? तुम्हाला मराठी भाषा कळत नाही का आता.? तुम्हाला साहेब म्हणून सांगितलेलं कळत नाही का?

*लोणीकर* - आता तुम्ही हे बंद करा ना, लोकांना त्रास का द्यायले? गहू पेरणीची वेळ आहे, आता ऊस लावणीची वेळ आहे, केळीला पाणी द्यायची वेळ आहे..

*अभियंता* - हा......

*लोणीकर*---सरकार पेक्षा मोठे आहेत का तुम्ही? राज्याच्या मुख्यमंत्र्यापेक्षा उपमुख्यमंत्र्यांपेक्षा? एवढा माज चांगला नाही.. तुम्हाला अधीक्षक अभियान त्यांनी सांगितलं, कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं की गावातल्या डीपी बंद करू नका.. आता शेवटची वार्निंग आहे नीट वागा साहेब म्हणून सांगितलं, हात जोडून सांगितल, ऐकायचे नसेल मराठी भाषेत सांगितलं, तर त्याचे फळ भोगावे लागतील, शेवटचा फोन आहे.. वीज वितरण कंपनीचे तुम्हाला लेखी आदेश.. तुम्ही काय ताजमहालमध्ये नाही जन्मले, गरिबीतलेच आहेत तुम्ही...

*अधिवेशनात टाकले तर एका मिनिटात सस्पेंड व्हाल....*

*लोणीकर* - ऐकले आता..

*अभियंता* - हो सर

*लोणीकर* - बरं....

इतर महत्वाच्या बातम्या

G-20 Summit: 'देश आणि राज्याप्रती 'त्यांचं' हे बेगडी प्रेम आहे', दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचा टोला कुणाला?

from maharashtra https://ift.tt/eEfWg04
BJP MLA Threat : भाजप आमदारांचं फोन संभाषण व्हायरल, महावितरणच्या अभियंत्याला अधिवेशनात निलंबित करण्याची धमकी
December 05, 2022
0
Tags