Ads Area

Aurangabad: औरंगाबादच्या जैन मंदिरातील मूर्ती चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ग्रामीण पोलिसांची उल्लेखणीय कामगिरी

Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून (Shri 1008 Chintamani Parsvanath Digambar Jain Mandir) सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्तीची अज्ञात चोरट्यांनी अदलाबदल केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या 24 तासांच्या आत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी (Aurangabad Rural Police) आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी दोघांना मध्यप्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

कचनेर येथे असलेल्या श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात महिनाभरापूर्वीच दोन किलो वजनाची सोन्याची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती बसवण्यात आली होती. मात्र अज्ञात व्यक्तींनी गाभाऱ्यातून ही दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती लंपास करत, त्याजागी पंचधातूची हुबेहूब दिसणारी मूर्ती बसविली. मूर्तीच्या पायाचा रंग पांढरा पडत असल्याने हा सर्व प्रकार समोर आला होता. त्यानंतर औरंगाबाद पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया यांनी दोन पथकांची नेमणूक करत तपासाच्या दृष्टीने इतर राज्यात रवाना करण्यात आले होते.

दोघांना ठोकल्या बेड्या...

मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीची पोलिसांनी पाहणी करत संशयीत आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर एक पथक थेट मध्यप्रदेशात पोहचले. तसेच संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मूर्तीची अदलाबदल केली असल्याची कबुली दिली आहे. तसेच सोन्याची मूर्तीचे वेगवेगळे भाग केल्याचे देखील आरोपींनी माहिती दिली आहे. तर याबाबत पोलीस अधीक्षक 11 वाजता पत्रकार परिषदेत आरोपींच्या नावाचा खुलासा करणार आहे. तर संपूर्ण घटनेची माहिती देखील देणार आहे.

from maharashtra https://ift.tt/wDqUjmI

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area