Ads Area

Ahmednagar News : स्वाभिमानीचे कार्यकर्ते मुळा धरणात उड्या घेणार, ठाकरे गटाचाही पाठिंबा; शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यानं आक्रमक पवित्रा

Swabhimani Shetkari Sanghatana : अतिवृष्टीने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यानं अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे.  आज दहा वाजता आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राहुरी (Rahuri) तालुक्यातील मुळा धरणात (Mula dam) उड्या घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार आहे.

20 डिसेंबरपर्यंत सरकारला दिला होता अल्मिमेटम

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली आहे. ही मदत मिळावी याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं वारंवार मागणी केली जात होती. अनेक वेळा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी निवदेने दिली होती तसेच आंदोलने देखील केली होती. मात्र, सरकारन स्वाभिमानीच्या निवेदनाची, आंदोलनाची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्यानं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 20 डिसेंबर पर्यंत सरकारने मदत न दिल्यास 21 डिसेंबर म्हणजे आज मुळा धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. आज स्वाभिमानीचे कार्यकर्ते थेट धरणात उड्या घेणार आहेत. त्यामुळं पोलिस प्रशासन सतर्क झालं आहे.

अतिवृष्टीचा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. याचा मोठा आर्थिक फटका अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. कारण त्यांची हाती आलेली पीक या पावसामुळं वाया गेली होती. अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाची दखल राज्य सरकार कशी घेणार? याबाबत सरकार काही ठोस आश्वासन देऊन शेतकऱ्यांना मदत करणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळं पोलिस आंदोलकांना रोखण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचा पाठिंबा

स्वाभिमानीच्या आजच्या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटान पाठिंबा दिला आहे. त्यामुळं आज होणार आंदोलन हे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गट हे एकत्र करणार आहेत. आजच्या या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याच लक्ष लागलं आहे. त्यामुळं प्रशासन, राज्य सरकार या आंदोलनाची कशी दखल घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/gc9uywQ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचे औरंगाबादमध्येही पडसाद, ऊस वाहतूक अडवली

from maharashtra https://ift.tt/95s2XVG

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area