28 December Headlines : अधिवेशनाचा आज 8 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची आज बैठक होणार आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज कारागृहातून बाहेर येणार आहेत. त्यानिमित्ताने अर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदीर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

अधिवेशनाचा आज 8 वा दिवस

अधिवेशनाचा आज 8 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची आज बैठक होणार असून अधिवेशनाच्या कालावधीचा निर्णय होणं अपेक्षित आहे. आज विविध विषयांवर 11 मोर्चे निघणार आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अनिल देशमुख आज कारागृहातून बाहेर येणार

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जामीनावरील स्थगिती उठवल्यानंतर आज ते कारागृहातून बाहेर येणार आहेत. त्यानिमित्ताने अर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदीर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम

28 डिसेंबर 1885 साली मुंबईतील तेजपाल सभागृह येथे काँग्रेसची स्थापना झाली होती. आज त्या ऐतिहासिक घटनेला 138 वर्षे पूर्ण होत आहेत. 28 डिसेंबर काँग्रेस स्थापना दिवस दरवर्षी संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात 'प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जातो. आज काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सत्कार होणार आहे. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे, श्री के सी वेणू गोपाल, एच के पाटील, इम्रान प्रतापगढी, कन्हैय्या कुमार, भाई जगताप, नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, चरणसिंग सप्रा यांच्यासह आदी नेते उपस्थित रहाणार आहेत, दुपारी 3.30 वाजता, सोमय्या मैदान, सायन येथे हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित चहा पानाच्या कार्यक्रमास शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार

शिंदें गटाचा दोन्ही ठाकरेंना दणका शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार, पदाधिकारी आज नागपूरमध्ये बाळासाहेबाच्या शिवसेनेत प्रवेश करत असताना मनसेचे पदाधिकारी ही शिंदे गटात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे अमित ठाकरे नशिकमध्ये असताना मनसेचे दोन विभाग अध्यक्षचा पक्षाला जय महाराष्ट्र या आधी शहर समनव्याक ही शिंदे गटात सहभागी झाल्यानं आधीच कमजोर असणाऱ्या मनसेला आणखी एक धक्का बसलाय.

संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन

आज संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन आहे. सकाळी 10 वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन तर संध्याकाळी 5.30 वाजता शरद पवार यांच्या हस्ते समारोप.

चंदा आणि दिपक कोचर यांच्यासह व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कस्टडी आज संपणार
आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी चंदा आणि दिपक कोचर यांच्यासह व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कस्टडी आज संपतेय. या तिन्ही आरोपींना पुढील रिमांडसाठी मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. सीबीआय आरोपींची आणखीन कस्टडीत वाढवून मागण्याच्या तयारीत तर आरोपींच्यावतीनं न्यायालयीन कोठडीसाठी प्रयत्न होतील. रिपोर्टर - अमेय

तुनिषा शर्माचा प्रियकर शीझान खानला आज न्यायालयात हजर केलं जाणार

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकर शीझान खानला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याला वालीव पोलिसांनी अटक केली असून तो चार दिवस पोलिस कोठडीत होता.

खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची लटकती तलवार यावर सुनावणी
महानगर दंडाधिकारी न्यायालय आज खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची लटकती तलवार यावर सुनावणी होणार आहे. दोघांविरोधात जारी आजामीन पात्र वॉरंटवर कारवाई करण्याचा शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

from maharashtra https://ift.tt/9CJ6lHE
28 December Headlines : अनिल देशमुख कारागृहातून बाहेर येणार, काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम, आज दिवसभरात
December 27, 2022
0
Tags