Ads Area

Weather Forecast : पुढील पाच दिवस 'या' राज्यात पावसाचा इशारा, शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

Weather Forecast : सध्या देशातील अनेक राज्यात पावसाची (Rain) स्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागात पाऊस पडत नसला तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. ईशान्य मोसमी पावसामुळं दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. यामुळं काही जिल्ह्यांमध्ये शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कुठे कधी पडणार पाऊस?

दरम्यान, येत्या काही दिवसात हवामान कसे असेल याबाबतची माहिती हवामान विभागानं दिल आहे. तीन ते सात नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, पुचुदेरी, कराईकल, केरळमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि दक्षिण केरळच्या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होणार आहे. त्याचा परिणाम आज (5नोव्हेंबरला) दिसून येणार आहे. यामुळं जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात पाच ते सात नोव्हेंबरला, तर उत्तराखंडमध्ये सहा आणि सात नोव्हेंबरला बर्फवृष्टीसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर पंजाबमध्ये पाच ते सात नोव्हेंबरला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काश्मीर खोऱ्यात सहा नोव्हेंबरला मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. त्यामुळे डोंगराळ भागात थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

या राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर

तामिळनाडूमधील, कांचीपुरम जिल्ह्यातील तंजावर, तिरुवरूर मायिलादुथुराई, नागापट्टिनम, कुंद्रथूर इथे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पुढील दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईतील महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये आठ नोव्हेंबरपर्यंत   मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात गारठा वाढला

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा निरोप घेतला आहे. महाराष्ट्रातही परतीचा पाऊस माघारी फिरला आहे. त्यामुळं सध्या राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात  घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात गारठा वाढला  आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. अनेक जिल्ह्यात थंडीमुळं हुडहुडी वाढली आहे. कोकणत देखील थंडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या उत्तरेकडून थंड आणि  कोरडे वारे वाहत आहे. या हवामानामुळं राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/LRAk5zo Weather : राज्यात गारठा वाढला, पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

from maharashtra https://ift.tt/VCRXJfP

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area