मुंबई: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा सहावा दिवस असून या यात्रेला राज्यातील 250 हून अधिक लेखक आणि कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. आज ही यात्रा हिंगोलीमध्ये येणार आहे. तसेच आज इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार नाही. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.

भारत जोडो यात्रेचा आज सहावा दिवस

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज सहावा दिवस असून आज ही यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवास करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला राज्यातील 250 हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कलाकार आज राहुल गांधीच्या यात्रेत पाहायला मिळाले.

आज लेखक, साहित्यिक दत्ता भगत , गणेश देवी, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत क्षीरसागर,विजय वाकडे, अभिजित शेट्ये यांच्यासह काही अन्य लेखकांनी राहुल गांधींशी भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच एक पत्रही त्यांना दिले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कळवा, मुंब्रा पूलाचं उद्घाटन

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातील दोन पुलांचं उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या पुलाचं उद्घाटन का होत नाही याबाबत ट्वीट केले होते. अखेर आज या पूलांचं उद्घाटन होत आहे. आधी तिसऱ्या कळवा पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण होईल. त्यानंतर मुंब्रा वाय जंक्शन इथे लोकार्पण होईल, तिथेच सभा होईल. विशेष म्हणजे यावेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित असतील.

मुख्यमंत्र्यांची डोंबिवलीत सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संध्याकाळी 5 वाजता डोंबिवली पूर्व कावेरी चौकात रस्त्याचं भूमीपूजन होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे.

दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

अभिनेत्री दिपाली सय्यद आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे. टेंभी नाका येथील पक्ष कार्यालयात तिचा पक्षप्रवेश होईल. दिपाली सय्यदने या आधी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.

मुंबईत आज सायक्लोथॉन

मॅरेथॉनच्या धर्तीवर मुंबईत आज सायक्लोथॉन स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये जवळपास पाच हजाराहून अधिक स्पर्धक देशभरातून सहभागी होणार आहेत. पहाटे 4.30 वाजता बीकेसी मधून या स्पर्धेला सुरुवात होईल. वरळी- वांद्रे सिलिंग मार्गे वरळीपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. देशभरातील 50 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये टी- 20 फायनल

टी- 20 वर्ल्डकप फायनलमध्ये आज इंग्लंड आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता होणार आहे.

from maharashtra https://ift.tt/oZP1HmR
Todays Headline: भारत जोडो यात्रेचा आज सहावा दिवस, इंग्लंड-पाकिस्तानमध्ये रंगणार फायनलचा थरार, आज दिवसभरात
November 12, 2022
0
Tags