Shraddha Murder Case: देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचा (Shraddha Murder Case) तपास दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) तपासात काही गोष्टी समोर येत असून वसईतील माणिकपूर पोलिसांनी (Vasai-Manikpur Police) या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवला का, अशी चर्चा सुरू झाली आहे. वसई पोलिसांनी या प्रकरणी तपासातील मानकांचे ( Standard Operating Procedure-SOP) पालन केले नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वसई पोलिसांकडून करण्यात आलेल्या एका फोन कॉलनंतर आफताबने श्रद्धाच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केली, असा दिल्ली पोलिसांचा कयास आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांचे पथक चौकशीसाठी वसईत दाखल झाले होते. या दरम्यान दिल्ली पोलिसांनी श्रद्धा आणि आफताबचे मित्र, त्यांचे सहकारी, नातेवाईकांची चौकशी केली होती. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा हरवली असल्याची तक्रार माणिकपूर पोलिसांना 12 ऑक्टोबर रोजी मिळाली होती. त्यानंतर माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याला 20 ऑक्टोबर रोजी संपर्क साधला होता. आफताबला 23 ऑक्टोबर रोजी वसईत चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

वसई पोलिसांच्या या फोन कॉलनंतर आफताब अधिक सतर्क झाला आणि त्याने पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केली असल्याचे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. वसई पोलिसांनी बोलवल्यानंतर आफताब हा दिल्लीहून वसईत आला. त्याने 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्याने श्रद्धाचा मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकून दिला. श्रद्धाचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असता तर अनेक गोष्टींचा उलगडा झाला असता.

पोलिसांकडून आता श्रद्धाचे व्हाट्सअॅप अकाउंट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जेणेकरून जुने चॅट्स, फोटो रिकव्हर करता येतील. पोलिसांकडून तांत्रिक पुरावे जमा करण्यात येत असून 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान श्रद्धाचा फोन अॅक्टिव्ह होता, असे आढळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

श्रद्धाच्या वडिलांनी तक्रारीत आफताबवर संशय व्यक्त केला होता. तरीदेखील, माणिकपूर पोलिसांनी आफताबचा जबाब नोंदवताना त्याचा फोन स्कॅन केला नाही, असेही म्हटले जात आहे.

मे महिन्यात श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने श्रध्दाचे मोबाईल सिमकार्ड नष्ट केले. मात्र तिचा मोबाईल वायफायद्वारे वापरला जात होता. श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट वापरल्याचेही तपासादरम्यान समोर आले आहे.

आफताबाने श्रद्धाच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला होता. त्यानंतरही त्याने मोबाईल फॅक्टरी रिसेट केला. जेणेकरून कोणताही पुरावा, डेटा रिकव्हर करता येणार नाही.

आणखी एकाचा सहभाग?

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी आणखी एक मोठी माहिती देताना सांगितले की, श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आणखी एका आरोपीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. या आरोपीने श्रद्धाची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यास त्याची मदत केली असावी असा पोलिसांना संशय आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आफताबचे कुटुंबिय, त्याच्या जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवत घेत आहेत.

from maharashtra https://ift.tt/xijUIyJ
Shraddha Murder Case: 'त्या' फोन कॉलनंतर आफताबकडून पुरावे नष्ट करण्यास सुरुवात?
November 27, 2022
0
Tags