Ads Area

Nashik News : सावधान! नाशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेटसक्ती, नियमांचा भंग केल्यास कारवाई, 'हे' आहेत चेकिंग पॉईंट

Nashik News : आजपासून पुन्हा नाशिक (Nashik) शहरात दुचाकी चालकांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. गाडी चालवताना हेल्मेट न घातल्यास मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई होणार आहे. तसेच पाचशे रुपयांचा दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळं आता नाशिककरांना दुचाकीवर घराबाहेर पडताना सोबत हेल्मेट बाळगणं आवश्यक आहे.

नाशिकमधील हेल्मेट सक्तीची मोहीम तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीनंतर थंडावली होती. मात्र, आता पुन्हा मोहिमेला सुरुवात झाली असून आजपासून शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून दुचाकी चालकांना एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्यावर आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. कारवाईला सामोरे जायचे नसल्यास चांगल्या प्रतीचे हेल्मेट दुचाकी धारकांना वापरणे  बंधनकारक आहे. आजपासून काही दिवस थंडावलेल्या हेल्मेटसक्ती मोहिमेला नाशिककरांना पुन्हा सामोरे जावे लागणार आहे.

नाशिकमध्ये हे आहेत हेल्मेट चेकिंग पॉईंट

नाशिक पोलिसांकडून शहरातील चेकिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. आज शहरातील स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत गाड्यांची चेकिंग होणार आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तत्कालीन पोलीस आयुक्त पांडे यांनी रस्ता सुरक्षा दृष्टीने हेल्मेट वापरा संबंधी जनप्रबोधनपर अभियान राबवत मागील वर्षी नो हेल्मेट नो पेट्रोलचा आदेश काढला होता. त्यासाठी भरारी पथकांची ही नियुक्ती केली होती. तसेच शहरात 'हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही' असेही प्रयोग राबवण्यात आला होता. हा प्रयोग काही अंशी वादात सापडला होता. त्यानंतर नाशिक शहरातील शासकीय आस्थापना, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयात 'हेल्मेट नाही तर सहकार्य नाही' हा प्रयोग नंतर राबवण्यात आला. मात्र पांडे यांच्या बदलीनंतर हे अभियान बाजूला पडले. पुन्हा एकदा शहर वासियांकडून पहिले पाढे पंच्चावन सुरु झाले. तसेच हेल्मेट सक्ती बाबतची पोलिसांकडून केली जाणारी कारवाई देखील मंदावल्याचे दिसून येत होती.  नाशिक मधील हेल्मेट सक्तीचा मुद्दा हा राज्यभर चर्चेत राहिला होता मात्र त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम थंडावली होती. मात्र पुन्हा एकदा नाशिक पोलिसानी कंबर कसली असून आजपासून हेल्मेटसक्ती सुरू करण्यात आली आहे. आता पुन्हा या मोहिमेला नाशिककर कसा प्रतिसाद देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

कठोर कारवाई करणार

नाशिक शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पोलिसांनी राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गावर गस्त वाढवली असता अपघातांमध्ये बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये वेळोवेळी मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. त्या त्या वेळी अपघातांच्या संख्येमध्ये व गंभीर दुखापतीमध्ये घट झाल्याचे आढळून आले आहे. दुचाकी स्वरांचे होणाऱ्या अपघात व त्यामध्ये होणारे प्राणहानी गंभीर जखमा व त्यामुळे येणाऱ्या अपंगत्व या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नाशिक शहरातील सर्व दुचाकीधारकांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरून आपल्या दुचाकी वाहन चालवावे व वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस विभाग विभागाकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी मनोज तिवारींना ठोठावला दंड, ट्वीट करत म्हणाले...

from maharashtra https://ift.tt/X5b1xAy

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area