Nana Patole : जगातील आणि देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार नोटबंदीच्या काळात झाला आहे. ते पैसे भाजपच्या घरात गेले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नांदेडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर (BJP Govt) जोरदार हल्लाबोल केला. भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधी यांना बदनाम केले, पण आता लोकांना वास्तव काय ते लक्षात आलं असल्याचे पटोले म्हणाले.

महात्मा गांधींप्रमाणेच राहुल गांधींचा मार्गही अहिंसेचा

काँग्रेसची भूमिका कधीही अतिरेकी राहिलेली नाही. काँग्रेस हा अहिंसेला मानणारा पक्ष आहे. महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच राहुल गांधी यांचा मार्गही अहिंसेचा असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असल्याचे ते म्हणाले. अहिंसेच्याच मार्गाने देशाला पुढे नेता येतं, देशाला महासत्ता बनवता येतं असेही नाना पटोले यावेळी म्हणाले. यावेळी मोदी सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस अतिरेकी भूमिका कधीही घेणार नाही. राहुल गांधी ज्या वाटेनं निघाले आहेत, तो अहिंसेचाच मार्ग असल्याचे पटोले म्हणाले.

from maharashtra https://ift.tt/NSrXoae
Nana Patole : नोटबंदीच्या काळात जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार, ते पैसे भाजपच्या घरात, नाना पटोलेंचा आरोप
November 13, 2022
0
Tags