<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/j71FGrs Weather : यंदा महाराष्ट्रात थंडी सुरु व्हायला नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला आहे. मागच्या दोन दिवसांपासून सर्वत्र तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली आलं आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असो की मराठवाडा सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरु झाला आहे. ज्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. तसंच लहान मुलं शाळेत जाताना उबदार कपडे परिधान केल्याचं दिसून येत आहे आणि सकाळी व्यायाम असेल किंवा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा (<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/SyGM8rc Wave) अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईतही हवेत गारवा, पुण्यात अनेक ठिकाणी पारा घसरला
दररोजच्या दमट हवामानाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांनाही थंडीचा अनुभव घेत आहे. मुंबईतही हवेत गारवा जाणवू लागला आहे. शहरातील किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. कर्जतमध्ये 14 अंश सेल्सिअस तर लोणावळ्यात 13.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातील तळेगाव स्टेशनवर 10 अंश सेल्सिअस इतकी कमी तापमानाची नोंद झाली. पुण्यातील पाषाणमध्ये किमान तापमान 8.7अंश सेल्सिअस, अहमदनगर 9.8, राहुरी 9.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे.

नाशिकमधील ओझर सर्वाधिक थंड
महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी नाशिकच्या ओझरमध्ये पडल्याची दिसते. परिणामी कडाक्याच्या थंडीने ओझरकर गारठले आहेत. निफाड तालुक्यातील ओझरमध्ये आज 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एचएएलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ही नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचं हे निचांकी तापमान आहे. निफाड आजचे किमान तापमान 7 अंश सेल्सिअस एवढं आहे.

धुळ्यातील तापमान 7 अंशांवर
उत्तर महाराष्ट्रातीलच धुळे शहरासह जिल्ह्यातील तापमानात सध्या घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तापमान सात अंशावरती आले असून या वाढत्या थंडीचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. यासोबतच पुढील काही दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्राचा पारा देखील आणखी घसरणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. नाशिक ओझर आणि धुळे जिल्ह्याच्या तापमानात सध्या मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिक सकाळीच घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा आधार घेत असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. पुढील काही दिवसात हा पारा आणखी घसरणार असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये 8 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान
नंदुरबार जिल्ह्यात सपाटी भागात तापमान 10 अंश तर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमान 8 अंश सेल्सिअसच्या खाली पोहोचलं आहे. सातपुड्यात कडाक्याची थंडी पडली आहे.

परभणीतील तापमान 8 अंश सेल्सिअस
दुसरीकडे मराठवाड्यातील परभणीमधील आजचं तापमान 8 अंश सेल्सिअस आहे. कालचं तापमान 8.3 अंश सेल्सिअस होतं. कालपेक्षा आज पॉईंट 3 ने तापमान घसरलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे.

from maharashtra https://ift.tt/H18CIzi
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज, नाशिकमधील ओझर सर्वात थंड
November 20, 2022
0
Tags