Ads Area

Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती गौताम अदानी यांच्यात बैठक, सकारात्मक चर्चा झाल्याची उद्योगमंत्र्यांची माहिती

Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यात रात्री उशीरा दीड तास बैठक झाली. यावेळी  उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. राज्याच्या विकासासाठी ही सकारात्मक ही बैठक झाली आहे. गौतम अदानी हे राज्याचे नाही तर देशाचे मोठे उद्योगपती असल्याचे मत उदय सामंत यांनी बैठक झाल्यानंतर व्यक्त केले.

अडीच वर्षाच्या सरकारमध्येच सगळे प्रकल्प बाहेर गेले

या बैठकीनंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासासाठी ही बैठक सकारात्मक झाली आहे. गौतम अदानी हे राज्याचे नाही तर देशाचे मोठे उद्योगपती असल्याचे सामंत यांनी सांगितले. दरम्यान, विरोधकांकडून नाहक बदनामी केली जात आहे. गेल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्येच हे सगळे प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्याची श्वेतपत्रिका उद्योग खात्यातून काढण्यात येणार असल्याचे सामंत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्येक घटकांच्या उद्धारासाठी काम करत असल्याचे सामंत म्हणाले.

कोणी चित्रपट बघायला गेलं म्हणून त्याला मारहाण करणं चुकीचं

लोकशाहीच्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचा विरोध करणे मी समजू शकतो. कोणी चित्रपट बघायला गेल्यामुळं त्याला मारहाण करणं हे चुकीच असल्याचे मत सामंत यांन व्यक्त केलं. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस योग्य ते कारवाई करतील. आपल्याला व्यक्ती स्वतंत्र आहे. मारीमारी करणं चुकीचं असल्याचे सामंत म्हणाले.

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन नाही

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर सामंत यांनी विचारण्यात आले. राजकारणात कोणीही महिलेवर टिप्पणी करु नये. अब्दुल सत्तार यांनी जे काल वक्तव्य  केलं, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. याची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही याची आम्ही सर्वजण दक्षता घेऊ असे सामंत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

अंबानी-अदानी एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणार नाहीत! काय आहे रिलायन्स-अदानी समूहाचा 'नो पोचिंग करार'?

from maharashtra https://ift.tt/MDAUuaZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area