Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

भारत जोडो यात्रेत काँग्रेसची नारी शक्ती सहभागी होणार

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी अशी ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने आज भारत जोडो यात्रेत काँग्रेसची नारी शक्ती सहभागी होणार आहे. भारत जोडो यात्रेला आज गजाननदादा पाटील मार्केट यार्ड, शेगाव येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर जलंब या ठिकाणी सकाळी 10 वाजता विश्रांतीसाठी ही यात्रा थांबेल. दुपारी चार वाजता जलंब येथून पुन्हा एकदा पदयात्रेला सुरुवात होणार आहे.

लोकल मार्गांवर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक

मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज आणि उद्या प्रवासाचा बेत असेल तर मुंबई आणि ठाण्यात वाहतूक व्यवस्थेत केलेले बदल लक्षात घेऊनच प्रवासाला निघा. कारण मध्य रेल्वेवर आजपासून 27 तासांचा मेगाब्लॉक आहे. तर ठाण्यात कोपरी पुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलाय. सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान असलेला धोकादायक कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतोय. या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात.. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्यात... कर्नाक पुलाच्या कामासोबत ठाण्यात कोपरी पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आलेत.. गर्डर टाकण्याचे काम शनिवारी-रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. या कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीय..

मद्यधुंद पोलीस वाहन चालकाने दिली तीन वाहनांना धडक

राहुल गांधी यांच्या सभेतून परत येणाऱ्या तीन वाहनांना खामगाव शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वाहनाने धडक दिल्याने तीनही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन वाहन पोलीस कर्मचारी असलेल्या चालकाने खामगाव शहराजवळ मद्यधुंद अवस्थेत भरधाव चालविल्याने हा अपघात घडला. यात खा.राहुल गांधी यांच्या सभेतून आपल्या गावी परत जात असलेल्या तीन वाहनांना या पोलीस वाहनाने धडक दिली यात या तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं , मध्यरात्री खामगाव शहराजवळ हा अपघाड झाला , सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

from maharashtra https://ift.tt/CgTkvtP
Maharashtra News Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
November 18, 2022
0
Tags