Ads Area

Maharashtra News Updates 17 November 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/P10FeOy Reservation : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लागू होणार की नाही याचा फैसला आज, गुरुवारी सुप्रीम कोर्टात होणार आहे.  राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत ही सुनावणी होणार आहे. मागच्या चार-पाच वेळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नव्हती अखेर आजची तारीख सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांचे काय होणार याचे उत्तरही या सुनावणीत मिळणार आहे. सोबत बीएमसीच्या प्रभाग रचनेबाबत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात जायला सांगितलं होतं, त्याबाबत हायकोर्टातही आजच सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आगामी 92 नगरपरिषदांना लागू होत नव्हता. मात्र या निकालावर राज्य सरकारनं पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय विशेष खंडपीठ गठित करणार असल्याचंही म्हटलं होतं.

ऊस दरावरुन रयत क्रांती संघटना आक्रमक, बेळगावच्या साखर आयुक्तालयाला ठोकलं टाळे

दिवसेंदिवस ऊस दराच्या (sugarcane price) मुद्यावरुन वातावरण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शेतकरी संघटना आक्रमक होत आहे. रयत क्रांती संघटनेनं (Ryat Kranti Sanghatana) ऊसाला प्रतिटन  5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी रयत क्रांती सघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी बेळगावातील गणेशपूर रोडवरील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.

योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार
ऊस दराच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पण या मागणीकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ऊस दरप्रश्नी  साखर कारखानदारांनी एकजूट केली असून, त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळं आक्रमक बनलेल्या रयत संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी  बेळगावात साखर आयुक्तालयास टाळे ठोकले. या आंदोलनामुळं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, कारखानदार आणि सरकारकडून योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. साखर आयुक्त कार्यालयात उपस्थित नसल्यानं रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयास टाळे ठोकले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार लोकार्पण
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कार्यान्वित करण्यात येणा-या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.   उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार श्रीमती वर्षा गायकवाड, आमदार सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याशिवाय महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांचीही उपस्थिती असणार आहे. दुपारी चार वाजता होणारा हा कार्यक्रम धारावी परिसरातील शीव – वांद्रे लिंक रोड नजीक असणा-या संत रोहिदास मार्गावरील ओएनजीसी इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक दोन व काळा किल्ला नजिक हा कार्यक्रम आयोजित होणार आहे.

from maharashtra https://ift.tt/iYWsZQH

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area