Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/5kmHRXL Crime News : मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे झाला वडिलांच्या खुनाचा उलगडा, आई आणि प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे (Crime News) एका खुनाचा तब्बल 3 महिन्यानंतर उलगडा झाल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ब्रम्हपुरी शहरातील गुरुदेव नगरातील ही घटना आहे. मुलीने आईबद्दल असलेले सत्य जगासमोर आणले. काय घडलं नेमकं?

आईने सांगितलेली बाब मुलींनी सत्य मानली

या घटनेबाबत माहिती अशी की, श्याम रामटेके असं 66 वर्षीय मृतकाचं नाव आहे. त्यांचा 3 महिन्यांपूर्वी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. हार्ट अटॅकने त्यांचा झोपेत मृत्यू झाल्याचं पत्नीकडून सांगण्यात आलं. रामटेके यांचं वय 66 वर्ष असल्याने सर्वांनी यावर विश्वास देखील ठेवला. आईने सांगितलेली बाब सत्य मानून नागपुरात असलेल्या दोन्ही मुली वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आल्या. त्यानंतर रीतसर अंत्यविधी झाला. यानंतर आई एकटीच घरी राहते, यावरून लहान मुलगी ब्रह्मपुरी येथे राहण्यास आली. सर्व प्रकरण शांत झालं असतांना मात्र या प्रकरणात मोबाईल मुळे एक मोठा ट्विस्ट आला.

<a href="https://ift.tt/U0w9jbo Jodo: भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशिममध्ये; मेधा पाटकर, तुषार गांधी सहभागी होणार, असा आहे आजचा कार्यक्रम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आज विदर्भातील वाशिममध्ये असणार आहे. भारत जोडो यात्रेचा आजचा 70 वा दिवस तर महाराष्ट्रातील 10 वा दिवस आहे. मंगळवारी या यात्रेने विदर्भात प्रवेश केला असून आज ती वाशिममधील मालेगाव या ठिकाणाहून सुरू होणार आहे. या यात्रेत आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी सहभागी होणार आहेत.

भारत जोडो यात्रेने 7 नोव्हेंबरला तेलंगणातून देगलूरमार्गे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला होता. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाक्यावरुन पैनगंगा नदी ओलांडत भारत जोडो यात्रा मंगळवारी विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि विदर्भातील इतर प्रमुख नेते होते. पुढचे पाच दिवशी ही यात्रा विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यातून जाणार आहे.

<a href="https://ift.tt/cTwE9vV Andhare In Kolhapur : कोणता शेतकरी आपल्या चार्टर विमानाने शेतात उतरतो? सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंना बोचरा सवाल

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुरुंदवाड महाप्रबोधन यात्रेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. अंधारे यांनी आपल्या रोखठोक शैलीत बंडखोरांचा समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी चांगलाच हल्ला एकनाथ शिंदे यांच्यावर चढवला.

त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का? मग एवढं कशासाठी बोलता? रिक्षाचालक सांगता, तर शेतकरी मध्येच कोठून आणला? तुम्ही जे सांगता ते, तरी लक्षात ठेवा. शेतकऱ्याच्या मुलाने जरुर मुख्यमंत्री झालं पाहिजे, पण गरीब शेतकऱ्याच्या. एकनाथ भाऊ तुम्ही गरीब शेतकरी आहात का? मुंबईतून जाताना स्पेशल चॅर्टर विमानाने जाता. असा कोणता शेतकरी आहे दाखवा जो चॅर्टरने आपल्या शेतात जातो? एबीपी माझाने याबाबत स्टोरी केली होती. तो माझ्याकडे आता नाही, मी तुम्हाला दाखवतो. त्या पुढे म्हणाल्या एवढं मोठं घर बांधता, रिसाॅर्ट बांधता मग गरीब शेतकरी कसा काय असू शकतो? तुम्ही घराणेशाहीवर बोलता, तर तुम्ही तुमच्या मुलाला राजकारणात का आणले?

from maharashtra https://ift.tt/WDe81d3
Maharashtra News Updates 16 November 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
November 15, 2022
0
Tags