Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/JvK4SOh Jodo : राज्यातील 250हून अधिक लेखकांचा भारत जोडोला पाठिंबा; राहुल गांधींकडे पत्राद्वारे केल्या या मागण्या...

Bharat Jodo Yatra: कन्याकुमारी ते काश्मीर अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यान एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. आता असंच एक नवं अपडेट समोर आलं आहे. राज्यातील 250हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कलाकार आज राहुल गांधीच्या यात्रेत पाहायला मिळाले.

आज लेखक, साहित्यिक दत्ता भगत , गणेश देवी, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत क्षीरसागर,विजय वाकडे, अभिजित शेट्ये यांच्यासह काही अन्य लेखकांनी राहुल गांधींशी भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच एक पत्रही त्यांना दिले. ज्यात या लेखकांनी काही मागण्या केल्या आहेत. सध्याचे सरकार आम्हाला पसंद नाही. तुमचेही सॅाफ्ट हिंदुत्वही आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका देखील लेखकांनी राहुल गांधींसमोर मांडली.

माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी म्हटलं की, आम्ही आमची भूमिका आधी तपासली. देशात जे सध्या चालू आहे त्यावरुन आम्ही एक निवेदन केलं. आम्ही राहुल गांधींना सॉफ्ट हिंदुत्वाच्या भूमिकेबाबतही बोललो. शिक्षण उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. केंद्र आणि राज्य दोन्हीकडून शिक्षणासाठी किमान 10 टक्के वाटप करणे ही आपल्या तरुणांची आणि मुलांच्या भविष्याची आणि भविष्याची गरज आहे, असा विचार करून समर्थन करतो. शेती ही भारताची मूलभूत आणि टिकाऊ संस्कृती आहे आणि आमचे कष्टकरी शेतकरी हे आमचे "अन्नदाता" आहेत परंतु चुकीच्या आणि शोषणात्मक धोरणांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्यांची चिंताजनक संख्या चुकीची आणि शेतकरी विरोधी धोरणे दर्शवते. आमच्या लेखकांनी शेतकर्‍यांचे दु:ख आणि त्यांचा दैनंदिन संघर्ष बळजबरीने मांडला. कारण आपल्यापैकी बरेच जण आधी शेतकरी आणि नंतर लेखक आहेत आणि त्यांना खूप काळजी वाटते. आम्हाला आशा आहे की भविष्यात या कृषी समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकरी समर्थक धोरणे चांगली असतील. शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आम्ही अशा उपायांचे जोरदार समर्थन करतो, असं देशमुख यांनी म्हटलं.

मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती! केंद्रीय पथकाकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठिकाणी पाहणी

मुंबईकरांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. कारण मुंबईमध्ये गोवर रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राकडून देखील दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय पथकाकडून आज गोवरचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या एम-पूर्व विभागात जात ठिकठिकाणी पाहणी करण्यात आली. उद्या देखील केंद्रीय पथकाकडून गोवरचा उद्रेक असलेल्या विभागात जात पाहाणी आणि आढावा घेतला जाणार आहे.

from maharashtra https://ift.tt/3OMhBG5
Maharashtra News Updates 13 November 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
November 12, 2022
0
Tags