Ads Area

Chandrakant Patil : पुण्यात आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारं संशोधन केंद्र उभारणार : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : पुण्यामध्ये (Pune) आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारं संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. पाच एकर क्षेत्रावर हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून, यासाठी उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी पुढे यावं असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरच्या  सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स एज्यु फेस्ट -2022 (Maratha Chamber of Commerce, Industry & Agriculture) कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते.

शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील कामाची माहिती द्यावी

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित एज्यु फेस्ट -2022  शिक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारा  कार्यक्रम असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमूख, कौशल्य विकास, गरजेप्रमाणे देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच संस्कृती, तत्वज्ञान आणि विज्ञानाला स्थान देण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले. यापुढं विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकसित करणारे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांना परवानगी देणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्या समन्वयाने शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील कामाची माहिती दिली पाहिजे. त्यांना रोजच्या जीवनात उपयोगी पडणारे शिक्षण द्यायला हवे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले  (Vikram Gokhale) यांना चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. विक्रम गोखले  यांचे काल वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेली माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमूख, कौशल्य विकास, गरजेप्रमाणे देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच संस्कृती, तत्वज्ञान आणि विज्ञानाला स्थान देण्यात आले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुणे हे शिक्षणाबरोबर औद्योगिकदृष्ट्या महत्वाचे केंद्र आहे. एज्यु फेस्ट -2022 या कार्यक्रमात सुमारे 21 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. शैक्षणिक संस्थानी वेगवेगळ्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची सहल आयोजित करावी, असे आवाहन मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक डॉ. प्रशांत गिरबने यांनी केलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक डॉ.प्रशांत गिरबने, सीओईपीचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पवार, भारत अगरवाल आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/vO8RFTU Patil: आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटी देणार; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

from maharashtra https://ift.tt/wLAyP1l

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area