Rayat Kranti Sanghatana : दिवसेंदिवस ऊस दराच्या (sugarcane price) मुद्यावरुन वातावरण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शेतकरी संघटना आक्रमक होत आहे. रयत क्रांती संघटनेनं (Ryat Kranti Sanghatana) ऊसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी रयत क्रांती सघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी बेळगावातील गणेशपूर रोडवरील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.

योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार

ऊस दराच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पण या मागणीकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ऊस दरप्रश्नी साखर कारखानदारांनी एकजूट केली असून, त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळं आक्रमक बनलेल्या रयत संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बेळगावात साखर आयुक्तालयास टाळे ठोकले. या आंदोलनामुळं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, कारखानदार आणि सरकारकडून योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

from maharashtra https://ift.tt/WglYJA2
Agitation : ऊस दरावरुन रयत क्रांती संघटना आक्रमक, बेळगावच्या साखर आयुक्तालयाला ठोकलं टाळे
November 16, 2022
0
Tags