मुंबई : राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी टीका केली आहे. राज्यात ठिकठिकाणी आजही आंदोलनं केली जाणार आहेत. याबरोबरच कांग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातच्या राजकोट और सूरतमध्ये 2 जनसभांना संबोधित करणार आहेत. भारत जोडो यात्रेत विश्रांती घेऊन राहुल गांधी या सभांना उपस्थिती लावणार आहेत. मुंबई- शिवडी बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी आवश्यक असणारे धोरण सरकार राबवत नसल्याच्या आरोपावरुन शिवसेनेकडून लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

राज्यपालांविरोधात राज्यभर आंदोलन

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी टीका केली आहे. राज्यात ठिकठिकाणी आजही आंदोलनं केली जाणार आहेत. राज्यपालांच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीकडून सकाळी दहा आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वतीने मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. याबरोबरच उस्मानाबादमध्ये राज्यपालांविरोधात निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोलीत राष्ट्रादीच्या मेहबूब शेख यांच्या नेत्तृत्वात राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. याबरोबरच अहमदनगरमध्ये देखील जामखेडच्या खर्डा चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने निदर्शने केली जाणार आहेत.

सीमाप्रश्नांसंबंधी उच्चस्तरीय समितीची आज मुंबईत बैठक
महाराष्ट्र सरकारच्या उच्च स्तरीय समितीची सीमाप्रश्नांसंबंधी आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार आहे. सीमाप्रश्नाची सर्वोच्च न्यायालयात 23 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

राहुल गांधी आज गुजरात निवडणुकीसाठी प्रचारात उतरणार
कांग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातच्या राजकोट और सूरतमध्ये 2 जनसभांना संबोधित करणार आहेत. भारत जोडो यात्रेत विश्रांती घेऊन राहुल गांधी या सभांना उपस्थिती लावणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा आज गुजरात निवडणुकीसाठी प्रचार

प्रधानमंत्री मोदींच्या आज सुरेंद्रनगर आणि जंबूसर येथे सभा होणार आहेत.

शिवसेनेचे लाक्षणिक साखळी उपोषण

मुंबई- शिवडी बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी आवश्यक असणारे धोरण सरकार राबवत नसल्याच्या आरोपावरुन शिवसेनेकडून लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत उपस्थित राहणार आहेत.

नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात सुषमा अंधारेंची सभा
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेत आज कणकवलीत राणेंच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर ही जाहीर सभा आहे.

मुंबईत आम आदमी पक्षाचं आंदोलन

गोखले ब्रीज बंद झाल्यामुळे नागरिकांना होणारा वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे आम आदमी पार्टीकडून आंदोलन केलं जाणार आहे.

आदिवासी नागरिकांच्या समस्येवरील याचिकेवर सुनावणी
मेळघाट आणि अन्य आदिवासी भागातील मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू ओढवत आहे. तसेच तेथील नागरिकांना इतरही समस्या भेडसावत आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात डॉ. राजेंद्र बर्माआणि सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांच्यासह विविध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या असून या याचिकांवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

आझाद मैदानावर मच्छिमारांचा महामोर्चा
जागतिक मच्छिमार दिनानिमित्त केंद्र सरकारच्या वाढवण बंदर या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात आझाद मैदानावर मच्छिमारांचा महामोर्चा धडकणार आहे.

from maharashtra https://ift.tt/LB4FKqY
21 November : राज्यपालांविरोधात राज्यभर आंदोलन, शिवसेनेचे लाक्षणिक साखळी उपोषण, आज दिवसभरात
November 20, 2022
0
Tags