Weather Update : सध्या राज्यात पावसानं (Rain) निरोप घेतला आहे. पावसाच्या उघडीपीनंतर लगेच वातावरणात बदल झाला आहे. सध्या वातावरणात गारवा जाणवू (cold weather) लागला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. त्याचबरोबर कोकणात (Konkan) देखील मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचं चित्र दिसत आहे. कोकणात देखील थंडी जाणवू लागली आहे. कोकणातील सध्याचं वातावरण हे आंब्याला मोहर येण्यासाठी पोषक असल्याचं बोललं जातंय.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा निरोप घेतला आहे. महाराष्ट्रातही परतीच्या पाऊस माघारी फिरला आहे. त्यामुळं सध्या राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात (Temperature) घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात गारठा वाढला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळं हुडहुडी वाढली आहे. कोकणत देखील थंडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या उत्तरेकडून थंड आणि कोरडे वारे वाहत आहे. या हवामानामुळं राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. तर दिवसा असलेल्या स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढून कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान 20 अंशांच्या खाली आले आहे.

कोकणातील अनेक गावं धुक्यात हरवली

सकाळच्या वेळेला सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं कोकणातली अनेक गावं धुक्यात हरवून गेली आहेत. दुपारच्या वेळेला कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी मात्र हवेत गारवा अशा प्रकारचं वातावरण सध्या कोकणात अनुभवायला मिळत आहे. सध्याचे वातावरण हे आंब्याला मोहर येण्यासाठी पोषक आहे. पावसाळा संपताच कोकणात थंडीची चाहूल लागली आहे.

राजस्थानसह पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्येही थंडी वाढली

राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे आहे. याशिवाय थंडीचा कडाकाही वाढला आहे. तापमानातही घट झाली आहे. दिवसा सूर्य बाहेर पडेल, परंतु सूर्यास्तानंतर थंडीही वाढेल असा अंदाज आहे. कमाल आणि किमान तापमानात विशेष बदल होणार नाही. गेल्या एका आठवड्यात हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. रात्रीच्या वेळी आर्द्रतेचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. रात्री तापमानातही तीन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. दरम्यान, आणखी थंडी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/yHrehBp Update : पावसानं निरोप घेताच राज्यात 'थंडी'ची चाहूल, कोरड्या वाऱ्यामुळं वाढली हुडहुडी

from maharashtra https://ift.tt/AtamETp
Weather Update : कोकणात थंडीची चाहूल, अनेक गाव हरवली धुक्यात, आंब्याच्या मोहरासाठी पोषक वातावरण
October 28, 2022
0
Tags