Ads Area

Wardha Bus Accident : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; वर्ध्यात मोठा अनर्थ टळला

Wardha Bus Accident : वर्ध्यात (Wardha News) काल एसटी बसला (ST Bus) भीषण अपघात (Accident News) झाला असून चालकाच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे. या एसटी बसमधून जवळपास 50 ते 60 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून चालकाला मात्र दुखापत झाली आहे. स्थानिक रुग्णालयात चालकावर उपचार सुरु आहे.

आर्वी डेपो येथील एसटी बस वर्ध्याहून वरुडला निघाली असता. येळाकेळी नदीपूलावरुन जात असताना तांत्रिक बिघाडामुळे एसटी बसचा अपघात झाला. सुदैवाने प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास येळाकेळी नवीन पुलावर घडली. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मात्र, चालकाला दुखापत झाली असून उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. या घटनेमुळे सर्व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

पुलावरील कठड्यावर धडकली बस

वर्ध्याहून वरुडला निघालेल्या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस पुलावरील सिमेंट कठड्यावर जाऊन आदळली. बसचं नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांना काहीही कळण्याच्या आतच बस वेगात कठड्यावर जाऊन आदळली. अचानक घडलेल्या घडनेनं सर्व प्रवासी घाबरले. बसमधून तब्बल 50 ते 60 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांमध्ये काही लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश होता. चालकाच्या सतर्कतेमुळे ही बस पुलावर असलेल्या कठड्यावर धडकल्यानं मोठा अनर्थ टळला.

...नाहीतर नदीत कोसळली असती बस

अपघातग्रस्त एसटी बसमधून 50 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघात झाला त्या पुलावर जर सिमेंट बॅरिकेटिंग कठडे नसते, तर बस निश्चितच नदीत कोसळली असती आणि मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. पण म्हणतात ना काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. अपघातावेळी बस चालकानंही सतर्कता दाखवल्यामुळं सुदैवानं प्रवाशांचा जीव वाचला. मात्र चालकाला दुखापत झाली असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

from maharashtra https://ift.tt/d3WNOh0

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area