<p style="text-align: justify;"><strong>Prakash Ambedkar :</strong> भाजपला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नको होते, त्याच पध्दतीनं एकनाथ शिंदेसुद्धा (Eknath Shinde) त्यांना नको असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती होते का? हे पाहावं लागेल. परिस्थिती अनुकूल दिसली तर एकनाथ शिंदेंना भाजप सोबत घेईल असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. ते यवतमाळमध्ये बोलत होते.</p> <p style="text-align: justify;">सध्या जे राज्यात चाललं आहे ते राजकारणाच्या दृष्टीनं योग्य नाही असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. ही काही गादीची लढाई नाही. मतदार हा राजा आहे. त्या राजाला कोणाला बसवासं वाटतं तो त्याला बसवेल. तो निर्णय आनंदानं स्विकारावा असेही आंबेडकर म्हणाले. ज्याप्रमाणे भाजपला उद्धव ठाकरे हे नको होते, तसेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नको आहेत असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. हे बॅगेज त्यांना बाहेर काढायचे आहे. त्यांना परिस्थिती अनुकूल दिसली तरच एकनाथ शिंदे यांना निवडणुकांमध्ये सोबत घेतील असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती होते का हे पाहावं लागेल असेही ते म्हणाले.</p> <p style="text-align: justify;"> </p>
from maharashtra https://ift.tt/SE1znJY
Prakash Ambedkar : भाजपला ज्या पद्धतीनं उध्दव ठाकरे नको होते, त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेसुद्धा नको : प्रकाश आंबेडकर
October 14, 2022
0
Tags