Ads Area

Nashik Crime : लाचखोरीचे लोन आता लष्करी विभागापर्यंत, नाशिकमध्ये दोन अधिकारी सीबीआयच्या ताब्यात

Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेल्या लष्करी विभागातील अधिकारी एसीबीच्या (ACB) जाळयात सापडले आहेत. नाशिक शहरातील गांधीनगर मधील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (Cats) आवारात दोन लष्करी अधिकाऱ्यांना (Army Officer) लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नाशिक शहरात लाचखोरीचा (Bribe) आगडोंब उसळला असून पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन (Nashik NMC) याचबरोबर इतर विभागांपासून ते आता लष्करी विभागात देखील लाचेची घटना समोर आली आहे. नाशिक येथे नव्याने कार्यान्वित झालेल्या सीबीआय (CBI Raid) पथकाने ही कारवाई केली असून या दोघा लष्करी अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल च्या आवारात एका ठेकेदाराकडून एक लाख वीस हजार रुपयांची लाचेची मागणी मेजर हिमांशू मिश्रा कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले यांनी केली रक्कम गुरुवारी संध्याकाळी उशिरा कॅटच्या आवारात स्वीकारत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. सहाय्यक गिअर्सन इंजिनियर तर वाडिलें हे कनिष्ठ इंजिनियर पदावर असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रंजीत पांडे यांनी दिली. या दोघांनी ठेकेदारांकडून एका कामाच्या मोबदल्यात एक लाख वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम दोघांनी कॅट्सच्या आवारात स्वीकारली असता केंद्रीय विभागाच्या नाशिक पथकाने नेत्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान दोघा संशयित लाचखोरांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी व संबंधित लष्करी अधिकाऱ्यांच्या घर झडतीसाठी सीबीआयकडून न्यायालयाकडे सीबीआय कोठडीची मागणी करण्यात येऊ शकते. रात्री उशिरापर्यंत सीबीआयचे सापळा कारवाई पथक कॅटच्या आवारात तळ ठोकून होते. दरम्यान कॅटच्या आवारात झालेली ही लाचखोरीची घटना खळबळ उडून देणारी ठरली आहे. मिश्रा व वाडीले यांनी कंत्राट दाराकडे लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारल्याने लष्करी विभागात देखील भ्रष्टाचाराची कीड पसरत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

सैनिकी आस्थापनामध्ये अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. यामुळे आस्थापनांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कंत्राटदार आणि याबाबत सीबीआयच्या लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली होती. पथकाने या तक्राची दखल घेतली ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी तक्रारदाराकडून दोघांनी लाचीची रक्कम स्वीकारत असताना सीबीआयच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तर नाशिक शहरात सीबीआयच्या पथकाची हि दुसरी कारवाई आहे.

from maharashtra https://ift.tt/H3tuAmO

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area