<p>पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेेवेसाठी आरामदायी बससेवा सुरु केल्या आहेत. आता शिवनेरी आणि शिवशाही पाठोपाठ विजेवर धावणारी पहिली शिवाई बस येत्या डिसेंबर महिन्यापासून मुंबई-पुणे मार्गावर धावणार आहे. डिसेंबरपासून मुंबई- पुणे मार्गावर 100 शिवाई बस चालवण्यात येणार आहेत. प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतलाय. सध्या मुंबईतील परेल आगार सोडता अन्य आगारात या बससाठी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण करण्यात आलं आहे. ठाण्यातही या बससाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. तसेच परेल आगारात लवकरच हे काम पूर्ण होईल, असा विश्वास एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दर्शवलाय..</p>
from maharashtra https://ift.tt/DZwKniX
Mumbai - Pune : मुंबई-पुणे मार्गावर डिसेंबरपासून धावणार विजेवर चालणारी ‘शिवाई’ बस
October 16, 2022
0
Tags