Ads Area

Maharashtra Rain : आज कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. हवामान विभागानं (meteorological department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात चांगलाच पाऊस झाला.  औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील पालघर, जळगाव, नंदूरबार, धुळे, पुणे जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे.  आज कोककणसह, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र  तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे.

विविध भागात परतीचा पाऊस कोसळताना दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक जिल्ह्यांना परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना देखील बसला आहे. सध्या पिकं काढणीचा हंगाम सुरु आहे. अशातच पाऊस झाल्यानं सोयाबीनसह कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं सांगितली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील टाकळी अंबड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतातील उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या जोरदार पावसामुळं शेतात पाणी तुंबले आहे. यामुळं आता उरल्या-सुरल्या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं प्रशासनानं त्वरित पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  मराठवाड्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून परतीचा जोरदार पाऊस होत आहे. पाच जिल्ह्यांतील 14  महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे या पावसाचा पिकांना मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

पिकांचं मोठं नुकसान

ढगफुटीसदृश पावसामुळं सर्वच ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. तर या जोरदार पावसामुळं कपाशी, ऊस, तूर, मूग, सोयाबीन, फळबाग आदी पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत असतानाच परतीच्या पावसामुळं उरल्यासुरल्या पिकांचेही नुकसान झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/am5FTAI Rain: औरंगाबादच्या टाकळी अंबड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

from maharashtra https://ift.tt/E0b3qVr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area