Ads Area

Maharashtra News Updates 6 October 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी सहभागी होणार

आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. मोठ्या कालावधीनंतर सोनिया गांधी अशाप्रकारे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. सध्या यात्रा कर्नाटकातील म्हैसुर या ठिकाणी पोहचली आहे. 7 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेचा शुभारंभ केला. या यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर असा 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे.

अजित पवार बारामती दौऱ्यावर

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी अजित पवार विविध विकास कामांची पाहणी करतील. तसेच ते आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजता ते दौंड तालुक्यातील पारगाव येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत.

धुळ्यात बालाजी रथोत्सव

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धुळे शहरात बालाजीचा रथोत्सव पार पडतो. या रथोत्सवाला 200 हून अधिक वर्षांची परंपरा असून, शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात येते. या रथोत्सवाच्या मिरवणुकीत शहरासह शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यातील भाविक बालाजींच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीनिमित्त दरवर्षी 11 दिवस भगवान बालाजीचे वहन मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून काढण्यात येते.

from maharashtra https://ift.tt/7KeiIqy

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area