Maharashtra News LIVE Updates : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

अजूनही सिद्धेश कदम ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत

शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले. मात्र असे असले तरी पक्षांतर्गत कलह सुरूच आहे. रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे देखील शिंदे गटात गेले आहेत. मात्र रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम ठाकरे गटाच्या युवासेनेच्या (Yuva Sena) कोअर कमिटी कार्यकारणीत आहे. त्यामुळे त्यांना कार्यकरणीत अजूनही स्थान कसे काय? सवाल उपस्थित होत आहे. शिवसेना ठाकरे गटाची काल शिवसेना भवनात दसरा मेळावा (Dasara Melava) पूर्व तयारीसाठी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. याच बैठकीत सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत कसे ? असा प्रश्नं विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला.

आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. राज्यात अन्य ठिकाणी मात्र पावसानं उघडीप दिली आहे. सध्या परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातवरण तयार झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कुस्तीचा सराव करताना 23 वर्षीय पैलवानाचा मृत्यू

कुस्तीचा (Wrestling) सराव करताना 23 वर्षीय पैलवानाचा (Wrestler) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील (Kolhapur) तालमीत हा काल (3 ऑक्टोबर) प्रकार घडला. मारुती सुरवसे असं या पैलवानाचं नाव आहे. मारुची मूळचा पंढरपूर (Pandharpur) जिल्ह्यातील वाखरीमधील आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

from maharashtra https://ift.tt/nsa8Rk0
Maharashtra News Updates 4 October 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
October 03, 2022
0
Tags