ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे.

नोटा बंदी विरोधाल्या याचिकेवर खंडपीठा पुढे सुनावणी

2016 साली झालेल्या नोटा बंदी विरोधाल्या याचिकेवर खंडपीठा पुढे सुनावणी होणार आहे. आज खंडपीठ हे ठरवले कि खरच आता हा विषय ऐकण्याची गरज आहे कि नाही.

अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव

अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव 2022 महोत्सव 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. याचं उद्घाटन सकाळी 10 वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला अभिनेता निखील वैरागर आणि सिने अभिनेत्री मोनालिसा बागल उपस्थित राहणार आहेत.

धुळ्यात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक

मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे, सकाळी 11 वाजता.

दिल्लीत आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक

आज सकाळी 10.30 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत गहू आणि रब्बी पिकांची एफआरपी ठरवली जाण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाची एफआरपी 2015 रूपये इतकी आहे.

उधमपूर येथे एअर शो

जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील हवाई दलाला 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उधमपूर, जम्मू येथील एअर फोर्स स्टेशन येथे साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने उधमपूर एअर स्टेशनवर एअर शो आयोजित केला जाईल, ज्यामध्ये भारतीय वायुसेनेची सर्व आधुनिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर सहभागी होतील.

धार्मिक स्थळांचा सध्याचा दर्जा कायम ठेवण्याच्या आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी

सर्व धार्मिक स्थळांचा सध्याचा दर्जा कायम ठेवण्याच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये असे म्हटले आहे की 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा 15 ऑगस्ट 1947 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांचा दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन समाजाच्या विरोधात आहे. त्यामुळे ज्या पवित्र स्थळांवर परकीय आक्रमकांनी बळजबरीने मशीद बांधली होती, त्या ठिकाणांवर तो हक्क सांगू शकला नाही. यावर केंद्र सरकारने उत्तर द्यावे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 14 ऑक्टोबरपर्यंत आसाम आणि त्रिपुराच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 14 ऑक्टोबर या कालावधीत त्रिपुरा आणि आसामला भेट देणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू आज आगरतळा येथील नरसिंगगड येथे त्रिपुरा राज्य न्यायिक अकादमीचे उद्घाटन करतील आणि त्रिपुरा राष्ट्रीय कायदा विद्यापीठाची पायाभरणी करतील.

from maharashtra https://ift.tt/3ED2LCl
Maharashtra News Updates 12 October 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
October 11, 2022
0
Tags