Maharashtra Political News : खरी शिवसेना (Shivsena) ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. तसेच प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावे असं सांगत गिरीश महाजन यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना टोला लगावला आहे.

अजित पवार भावी मुख्यमंत्री बॅनरसंदर्भात

पुण्यातील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले असून यावर मंत्री गिरीष महाजन यांनी अजित पवार, एकनाथ खडसे यांना खास शैलीत चिमटा घेतला आहे. प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावे, अजित पवार यांनाही वाटत असेल, एकनाथ खडसे यांचे ही बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून लागले होते त्यांनाही वाटत होते, मी सुद्धा मुख्यमंत्री होईल, असा टोला गिरीश महाजन यांनी पवार खडसे यांना लगावला आहे

खरी शिवसेना कोणाची? गिरीश महाजन म्हणाले...
खरी शिवसेना कोणाची? यावर विविध चर्चा होत असताना खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे, याविषयावर बोलताना महाजन यांनी म्हटलं आहे की, शिंदे यांच्याकडे 40 आमदार आणि 12 ते 13 खासदार असून महानगरपालिका, नगरपालिका त्यांच्याकडे असून उद्धव ठाकरे यांनी कितीही फॉर्म भरून दिले. त्यात काही फायदा नसून खरी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे

भोसरी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी घाबरण्याची काय गरज आहे?

भोसरी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी घाबरण्याची काय गरज आहे? एकदा चौकशी होऊन जाऊ द्या झोटिंग समितीचा अहवाल आहे. त्यांचीही चौकशी होऊन जाऊ द्या मी नागपुरातील अधिवेशनात सरकारला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे. झोटींगचा ही अहवाल समोर येऊ द्या, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray : राज्यात मुख्यमंत्री कोण हे देवालाच माहित, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

from maharashtra https://ift.tt/3fS7u5m
Girish Mahajan : 'प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावे', गिरीष महाजनांचा अजित पवार, एकनाथ खडसेंना टोला
October 26, 2022
0
Tags