Ads Area

Dombivli : डोंबिवलीतील खंबालपाडा परिसरातील प्रकार, रात्रीचा फायदा घेत नाल्यात ओतले दुर्गंधीयुक्त केमिकल; गुन्हा दाखल

Dombivli MIDC : डोंबिवली पूर्व एम आय डी सी (MIDC) लगत असलेल्या खंबालपाडा (Khambalpada) परिसरात काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अचानक दुर्गंधी पसरली होती. ही दुर्गंधी याच परिसरातील नाल्यातून येत होती. नाल्यात केमिकल ओतल्याने ही दुर्गंधी पसरली असल्याचं समजत आहे.

खंबालपाडा परिसरात पसरली अचानक दुर्गंधी
याबाबत नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार केली असता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटना स्थळी पोहचले. एम आय डी सी परिसरातील नाले चेंबरची पाहणी केली. मात्र काही आढळून आले नाही. मात्र एम आय डी सी लगत असलेल्या खंबालपाडा परिसरात असलेल्या निर्माणाधिन इमारतीच्या आत असलेल्या नाल्यात केमिकलचे ड्रम ओतले असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दखल करत संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल असे संगितले .

नाल्याचे पाणी झाले पांढऱ्या रंगाचे
डोंबिवली एम आय डी सी परिसरात केमिकलची दुर्गंधी, त्यामुळे होणारे प्रदुषण ही नवीन समस्या नाही. मात्र या आसपासच्या परिसरात देखील या केमिकलमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास जाणवू लागला आहे. अनेकदा एम आय डी सी परिसरातील नाल्यात अज्ञातंकडून केमिकल सोडण्यात येत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरल्याच्या तक्रारी याआधी देखील करण्यात आल्या होत्या.  याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने  गंभीर दखल घेत ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र आता ही समस्या एम आय डी सी लगत असेलल्या परिसरात देखील भेडसावत असल्याचे दिसून आलं. डोंबिवली एमआयडीसी लगत असलेला खंबाळपाडा या परिसरात काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उग्र दर्प पसरला होता. या परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी पांढऱ्या रंगाचे झाले होते.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हे कृत्य
या नाल्यात दुर्गंधीयुक्त केमिकल सोडण्यात आल्याने ही दुर्गंधी पसरली होती. ही दुर्गंधी असह्य झाल्याने नागरिकांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यानी तत्काळ खंबालपाडा परिसरात धाव घेत या परिसरातील नाले तसेच एमआयडीसी परिसरातील नाले व चेंबर्सची पाहणी केली. याच पाहणी दरम्यान खंबालपाडा परिसरात असलेल्या एका निर्माणाधिन इमारतीच्या आवारात असलेल्या नाल्याच्या चेंबर मध्ये केमिकल ने भरलेले 15 ड्रम रिकामे केल्याचे लक्षात आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हे कृत्य करण्यात आलं होतं. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली याप्रकरणी दुर्गंधीयुक्त केमिकल थेट नाल्यात होणाऱ्या या कृत्या विरोधात गुन्हा दाखल करणार असून याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

from maharashtra https://ift.tt/ZLJPbfw

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area